पुण्याला 'जिजापूर' हे नाव द्या.. - Rename Pune as Jijapur Demand for Sambhaji Brigade Santosh Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्याला 'जिजापूर' हे नाव द्या..

सागर आव्हाड
रविवार, 3 जानेवारी 2021

पुण्याला 'जिजापूर' हे नाव द्या, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. 

पुणे : औरंगाबादचे नाव संभाजीनगर करायला वेळ लागत असेल तर... राष्ट्रमाता जिजाऊंनी बेचिराक झालेल्या पुणं वसवलं. त्या पुण्याला जिजाऊंचे नाव देऊन पुण्याचे 'जिजापूर' असे नामांतर करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे. 

पुण्याला जिजाऊंचा इतिहास आहे. शिवनेरीपासून लाल महालपर्यंत आणि पुरंदरपासून तोरणा, राजगड, सिंहगड, विसापूर, लोहगड, राजमाची, विचित्रगड ते स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वरपर्यंत... सह्याद्री कर्तुत्व आणि पराक्रमाचा इतिहास सांगत आहे. 

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आपला पुणे जिल्हा आहे. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आहे. पुण्यात राष्ट्रमाता जिजाऊंनी बाल शिवबाला घेऊन सोन्याचा नांगर चालून पुणे वसवलं, त्या पुण्याचं आज सोनं झालेले आहे. घडलं ते रयतेच स्वराज्य. नामांतराचे  राजकारणाचा करू नका. इतिहासातील प्रतिकांचा आदर करायला शिका. बाळासाहेब थोरात साहेब, टिळक वाड्यात बसून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कळणार आणि पचणार नाही, आमचा वारसा आम्हाला अजून गौरवपुर्वक चालवू द्या. म्हणून पुण्याला 'जिजापूर' हे नाव द्या, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. 

नामांतराच्या प्रश्नावर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी तीन दिवसांपूर्वी काॅंग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. निवडणुका आल्या की लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भावनिक मुद्दे उकरून काढले जातात. ही काही मंडळींची पद्धत आहे. मात्र, काँग्रेस आणि शिवसेना या चालीला फसणार नाहीत. नाव बदलल्याने सामान्य माणसाचं जीवन बदलत नाही. उत्तर प्रदेशमध्ये शहरांची नावं बदलून काय झालं, हे पाहिलं पाहिजे. सामान्य माणसाचे भले कसे होईल, यादृष्टीने आपण वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे आपलं उद्दिष्ट काय आणि आपण कशी वाटचाल करायची याबाबत संबंधितांशी चर्चा करु. उत्तर प्रदेशमध्ये शहरांची नावं बदलून काय झालं, हे पाहिलं पाहिजे. सामान्य माणसाचे भले कसे होईल, यादृष्टीने आपण वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे आपलं उद्दिष्ट काय आणि आपण कशी वाटचाल करायची याबाबत संबंधितांशी चर्चा करु, असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले होते.

औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करायचे की नाही याबाबत मी आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या मताशी सहमत आहे, अशी भूमिका सार्वजनिक बांधकाकमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडली. मुख्यमंत्री उद्धव हे जेव्हा याविषयी बोलतील आणि जेव्हा हा विषय सरकारकडे येईल तेव्हा बसून ठरवू, असे त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

औरंगाबादच्या नामांतरावरून सध्या महाविकास आघाडीत कुरबूर सुरू आहे. शिवसेनेने या नामांतराला पाठिंबा दिला आहे तर दुसरीकडे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यास काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोध केला आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख