पदवीधर निवडणुकीत सदाभाऊंची बंडखोरी; रयत क्रांतीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल - Rayat Kranti of Sadabhau Khot Fielded Candidate in Pune Graduate Constituency | Politics Marathi News - Sarkarnama

पदवीधर निवडणुकीत सदाभाऊंची बंडखोरी; रयत क्रांतीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल

सागर आव्हाड
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

महायुतीचा घटक असलेल्या सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेनं पुणे पदवीधर निवडणुकीत बंडखोरी केली. रयत क्रांती चे उमेदवार एन डी चौगुले यांनी आज पुणे पदवीधर साठी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे सदाभाऊ खोत हे यावेळी त्यांच्यासोबत होते.

पुणे : महायुतीचा घटक असलेल्या सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेनं पुणे पदवीधर निवडणुकीत बंडखोरी केली. रयत क्रांती चे उमेदवार एन डी चौगुले यांनी आज पुणे पदवीधर साठी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे सदाभाऊ खोत हे यावेळी त्यांच्यासोबत होते.

आपण महायुतीततच आहोत, मात्र एक स्वतंत्र पक्ष म्हणून ही निवडणूक लढवण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता होती. त्यामुळे हा अर्ज दाखल केल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपवर दबाव आणण्यासाठी सदाभाऊंची ही खेळी असल्याची चर्चा आहे. 

इस्लामपूर नगरपालिकेसह वाळवा तालुक्‍याचे राजकारण, जिल्ह्यातील राजकीय धोरण, पक्षातील पदाधिकारी निवडी या पातळीवर आपणास विश्‍वासात घेतले नाही, याचा सल सदाभाऊ खोत यांच्या मनात आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून रयत क्रांती संघटनेची उमेदवारी जाहीर करणे असो किंवा केंद्र सरकारच्या शेतमाल धोरणावर परखड शब्दांत टीका करणारे जाहीर निवेदन असो, सदाभाऊंनी भाजपवरील ही नाराजी उघड करायला सुरवात केली आहे. त्यातूनच ते भाजपची साथ सोडण्याच्या मनःस्थितीत असल्याची चर्चा आहे. 

सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडली, मात्र भाजपमध्ये स्वतः जाहीरपणे प्रवेश केला नाही. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चिरंजीव सागर खोत यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. वास्तविक, विधान परिषदेचे सदस्य होत असताना सदाभाऊंनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारलेले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी फारकत घेऊन वाजत-गाजत भाजपचा हात धरलेल्या माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना भाजप निर्णय प्रक्रियेत डावलत असल्याने ते बंडाच्या पावित्र्यात असल्याची चर्चा आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख