राजीव सातव यांची प्रकृती खालावली; राहुल गांधींचा डॉक्टरांना फोन  - Rajiv Satav's health deteriorated; Rahul Gandhi discusses with doctors | Politics Marathi News - Sarkarnama

राजीव सातव यांची प्रकृती खालावली; राहुल गांधींचा डॉक्टरांना फोन 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 29 एप्रिल 2021

त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यावेळी त्यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळत आहे.

पुणे : काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळत आहे. राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यावेळी त्यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करत सातव यांच्या प्रकृतीसंबंधी विचारपूस केली आहे.

परमबीरसिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा: अॅट्रॅासिटीसहन गुन्हेगारांना मदतीचा ठपका

२२ एप्रिलला राजीव सातव यांनी स्वतःहा ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती.  ते म्हणाले होते की ''सौम्य लक्षणे जाणवल्यानंतर चाचणी केली असता आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियमांचे पालन करावे'', असे त्यांनी सांगितले होते.  

यानंतर राजीव सातव पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्या मागील अनेक दिवसापासून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, त्यांची प्रकृती बिघडली असून मुंबईमधील लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमला बोलावण्यात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फोन करुन जहांगीरमधील डॉक्टरांकडे सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. राहुल गांधी आणि डॉक्टरांमध्ये बराच वेळ चर्चा सुरु होती, अशी माहिती मिळत आहे.

नरहरी झिरवळ का सांगताहेत, मी जिवंत आहे बघा!
 

हे ही वाचा 

भाजप नेत्या पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण 

बीड : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःहा ट्वीट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी कोरोना चाचणी केली होती ती पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत.

 पंकजा मुंडे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या की, ''माझ्या कोरोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून आधिपासूनच विलिगिकरणात आहे. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. व काळजी घ्या, असे मुंडे यांनी म्हटले आहे. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख