शेतकरी नाही म्हणाला तर विमानतळ नाही....

विमानतळाबाबत तुम्ही नाही म्हटला तर नाही होणार व हो म्हटला तरच होणार अशी स्पष्ट भूमिका मांडत शेतकऱ्यांनी निश्चिंत रहा.एकाही शेतकऱ्याला दगा देण्याचे काम करणार नाही शेतकऱ्यांचा निर्णय तोच आमचा निर्णय असेल असे आश्वासन आमदार संजय जगताप यांनी नव्याने सूचित विमानतळाच्या गावातील शेतकऱ्यांना दिले.
MLA Sanjay Jagtap Assures Farmers about Airport
MLA Sanjay Jagtap Assures Farmers about Airport

माळशिरस : पुरंदर तालुक्यात कुठलाही प्रकल्प शेतकऱ्याची संमती नसताना केला जाणार नाही असे आश्वासन शेतकऱ्यांना देत. विमानतळाबाबत तुम्ही नाही म्हटला तर नाही होणार व हो म्हटला तरच होणार अशी स्पष्ट भूमिका मांडत शेतकऱ्यांनी निश्चिंत रहा.एकाही शेतकऱ्याला दगा देण्याचे काम करणार नाही शेतकऱ्यांचा निर्णय तोच आमचा निर्णय असेल असे आश्वासन आमदार संजय जगताप यांनी नव्याने सूचित विमानतळाच्या गावातील शेतकऱ्यांना दिले.

पुरंदर तालुक्यातील विमानतळासाठी यापूर्वी निश्चित केलेल्या गावांच्या विरोधामुळे पर्यायी जागेसाठी सुचविलेल्या राजुरी ,रिसे, पिसे, पांडेश्वर ,नायगाव या गावातील विमानतळ विरोधी शेतकऱ्यांनी विमानतळास विरोध करण्यासाठी नायगाव येथील सिद्धेश्वर मंदिरात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आमदार संजय जगताप यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले व विमानतळाबाबत मी शेतकऱ्यांच्या बरोबर असेल. शेतकऱ्यांचा विरोध असेल तर विमानतळ होणार नाही अशी स्पष्ट भूमिका बैठकीत मांडली.

यावेळी आमदार संजय जगताप यांनी सांगितले की तालुक्यातील यापूर्वी नियोजित जागेवरती तेथील शेतकऱ्यांचा विरोध झाल्याने पर्यायी जागा सुचवणे गरजेचे होते म्हणून ते काम करण्यात आले .या जागेबाबत प्रशासन, अधिकारी स्तरावर कुठलाही अद्यापि निर्णय झाला नसून त्यापूर्वीच याठिकाणी शेतकऱ्यांकडून विरोध केला जात आहे .या जागेबाबत अधिकारी स्तरावर काय म्हणणे येते ते आपण पाहू .जर येथील स्थानिक शेतकऱ्यांना विमानतळ नको असेल तर ते होणार नाही .शेतकरी हो म्हटला तरच होईल. आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्यासाठी आपण मला निवडून दिले नाही . यामुळे कुठलीही शेतकऱी विरोधी चुकीची गोष्ट होऊ देणार नाही. याबाबत आपण निश्चिंत रहा हे सिद्धेश्वराच्या साक्षीने सांगतो. असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांना विश्वास दिला. तालुक्यात हो म्हणायचे ही राजकारण व नाही म्हणायला ही राजकारण केले जाते आणि नाहीच झाले तरी राजकारण होते अशी टीका देखील त्यांनी विरोधी गटा वर केली.

बैठकीत नायगाव ,राजुरी ,रिसे, पिसे ,पांडेश्वर या गावातील अनेक तरुणांसह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील ,माजी आमदार अशोक टेकवडे, राजुरी चे सरपंच उद्धव भगत, पिसेचे माजी सरपंच गणेश मुळीक, रिसेचे माजी सरपंच विश्वास आंबोले, नायगावचे बाळासो कड, विलास खेसे, प्रदिप खेसे ,महेश कड, नारायण चौंडकर ,सदाशिव खेसे, किशोर खळदकर यांच्यासह अनेकांनी आपल्या भावना मांडल्या. यावेळी उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी विमानतळास एकमुखी विरोध दर्शवला.

माझी राजीनाम्याची तयारी- आमदार जगताप
राजकारण करण्यासाठी मी पद घेतले नसून तालुक्यातील प्रत्येक माणसाची पदाच्या माध्यमातून कामे करण्यासाठी प्रयत्न करत असून तो माणूस कुठल्या पक्षाचा हे मी पाहत नाही. द्या सकाळी म्हटलं तरी माझी राजीनाम्याची तयारी आहे .माझी भूमिका स्पष्ट आहे अशा शब्दात आमदार संजय जगताप यांनी आपल्या भावना मांडल्या.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com