पुणे जिल्ह्यातील अंतिम  निकाल दुपारी चार वाजेपर्यंत अपेक्षित

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सोमवारी सकाळी दहा वाजता सुरुवात झालीआहे. मतमोजणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणार असून, अंतिम निकाल दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत जाहीर होतील, असा अंदाज आहे.
Pune District Grampanchayat Election Final Results may come after Four PM
Pune District Grampanchayat Election Final Results may come after Four PM

पुणे : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सोमवारी सकाळी दहा वाजता सुरुवात झाली आहे. मतमोजणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणार असून, अंतिम निकाल दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत जाहीर होतील, असा अंदाज आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या चार हजार 904 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 11 लाख 18 हजार 104 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला होता. जिल्ह्यात मतदान 80.54 टक्‍के झालेले आहे. जिल्ह्यातील उर्वरित 95 ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. 

जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमध्ये 649 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यासाठी 21 हजार 359 उमेदवारांनी एकूण 21 हजार 771 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आठ हजार 778 जणांनी अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे 11 हजार 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. पुरंदर तालुक्‍यातील पिंगोरी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.  सोमवारी (ता. 18) तालुक्‍याच्या ठिकाणी मतमोजणी सुरुवात झाली. अंतिम निकाल दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत जाहीर होतील अशी माहिती तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी दिली. 
 

तालुकानिहाय झालेले मतदान टक्‍केवारी (पुणे जिल्हा) 
तालुका ग्रामपंचायत मतदार संख्या एकूण मतदान टक्‍केवारी 
वेल्हे 20 14802 12832 86.69
भोर 63 66201 56621 85.53
दौंड 49 172370 136685 79.30 
पुरंदर 55 105283 87332 82.95 
इंदापूर 57 158599 129926 81.92 
बारामती 49 119457 101110 84.64 
जुन्नर 59 119965 91829 76.55 
आंबेगाव 25 54045 41567 76.91 
खेड 80 125279 102779 82.04 
शिरूर 62 167903 138975 82.77 
मावळ 49 82519 67464 81.76 
मुळशी 36 71310 54385 76.27 
हवेली 45 130581 96599 73.98 

Edited By - Amit Golwalkar











 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com