हर्षवर्धन जाधवांना मारहाण करणाऱ्यांवर  गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश - Pune Court Ask police to register FIR of Kannad MLA Harshawardhan Jadhav | Politics Marathi News - Sarkarnama

हर्षवर्धन जाधवांना मारहाण करणाऱ्यांवर  गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन आणि त्यांच्या महिला सहकाऱ्याला मारहाण करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश पुण्याच्या न्यायालयाने दिला आहे. या आठ जणांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यास न्यायालयाने सांगितले आहे. 

पुणे : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन आणि त्यांच्या महिला सहकाऱ्याला मारहाण करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश पुण्याच्या न्यायालयाने दिला आहे. या आठ जणांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यास न्यायालयाने सांगितले आहे. 

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात पुण्यात चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. एक किरकोळ अपघात प्रकरणावरुन झालेल्या भांडणात एका दांपत्याला मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आला आहे. अमन चड्डा या तरुणाने हर्षवर्धन जाधव व त्यांच्या सोबत असलेल्या इषा झा यांच्याविरोधात ही तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार फिर्यादी चड्डा यांचे आई-वडील दुचाकीवरुन औंध परिसरात जात असताना जाधव यांनी आपल्या चालत्या गाडीचा दरवाजा अचानक उघडला. त्यामुळे चड्डा यांच्या आईवडिलांना त्याचा धक्का लागला. चड्डा दांपत्याने जाधव यांना याचा जाब विचारल्यावर भांडण झाले. त्यावेळी आपली हृदयशस्त्रक्रीया झाली असल्याचे सांगून देखील जाधव व झा यांनी आपल्या आईवडिलांना मारहाण केली व खुनाचा प्रयत्न केला, अशी चक्रार अमन चड्डा यांनी दिली होती.

या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांना अटक करुन पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांना जामीन मिळण्यातही अडचण निर्माण झाली होती. हर्षवर्धन जाधव यांनीही अमन चढ्ढा यांच्या विरोधात तक्रार दिली होती. मात्र, त्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता. अखेर पुणे न्यायालयाने जाधव यांना मारहाण केल्या प्रकरणात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले आहेत. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख