पुणेकरांनो तर पुन्हा लागेल लाॅकडाऊन.... - Pune Collector warns another Lock Down | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

पुणेकरांनो तर पुन्हा लागेल लाॅकडाऊन....

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 जुलै 2020

पुणे जिल्हयातील ग्रामीण भागात गेल्या वीस दिवसांच्या कालावधीत मोठया प्रमाणात कोरोना बाधित रुग्णसंख्येत वाढ झाली. शहरालगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाला कडक भूमिका घ्यावी लागणार आहे, असा इशारा पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिला आहे

पुणे : शासनाने लॉकडाऊन शि‍थील केला आहे मात्र अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. पुणे शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहर तसेच ग्रामीण भागात अनेक नागरीक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर मास्क न वापरता तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन  न करता फिरत असल्याचे निर्दशनास येत आहे. अशी परिस्थ‍िती कायम राहिल्यास प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल प्रसंगी  पुन्हा लॉकडाऊन घोषित करावे लागेल असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे. 

जिल्हाधिकारी राम म्हणाले, ''पुणे जिल्हयातील ग्रामीण भागात गेल्या वीस दिवसांच्या कालावधीत मोठया प्रमाणात कोरोना बाधित रुग्णसंख्येत वाढ झाली. शहरालगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाला कडक भूमिका घ्यावी लागणार आहे. जिल्हयातील कुठल्याही गावात ५ पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळले तर संपूर्ण गावाला प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करावे लागणार आहे,'' 

ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच जनजागृतीवर भर दिला जाणर असलयाचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले, ''ग्रामीण भागात नागरीकांकडून मास्कचा वापर केला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे तसेच लग्नसमारंभात दिलेल्या नियमांचे पालन न करताच गर्दी होताना दिसून येत आहे. त्यादृष्टीने भरारी पथके तयार करण्यात आली असून संबंधितांना कडक कारवाई करण्यात येणार आहे,''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख