पुणे-पिंपरी चिंचवडकरांनो 'येथे' जाऊ नका, 'येथून' बाहेर पडू नका!

पुणेकरांनी आणि पिंपरी चिंचवडच्या रहिवाशांनो, आपल्या परिसरात कोरोनाचा धोका वाढत असल्याने प्रशासनाने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर केली आहेत. या सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातील व्यवहार मर्यादित राहिले तरच कोरोनाच्या उद्रेकाला आळा घालणे शक्य होणार आहे.
Pune Administration Announced Containment Zones in City and PCMC
Pune Administration Announced Containment Zones in City and PCMC

पुणे : पुणेकरांनी आणि पिंपरी चिंचवडच्या रहिवाशांनो, आपल्या परिसरात कोरोनाचा धोका वाढत असल्याने प्रशासनाने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर केली आहेत. पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात (कन्टेन्मेंट झोन) आता जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने देखील उघडी ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. या सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातील व्यवहार मर्यादित राहिले तरच कोरोनाच्या उद्रेकाला आळा घालणे शक्य होणार आहे. 

या आदेशाची अंमलबजावणी आज (सोमवार) रात्री बारा वाजल्यापासून पुढील रविवार (ता. 17) लागू राहणार आहेत. त्यामुळे या भागात केवळ दवाखाने सुरू राहणार आहेत. याबाबतचे आदेश नव्याने महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी रविवारी काढले.

पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ती रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपयोजना करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात रुग्णांची संख्या वाढत असलेल्या परिसर कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. असे सुमारे 69 झोन पुणे शहरात आहेत.

पुणे शहरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राची नावे :

मंगळवार पेठ, जूना बाजार, पर्वती दर्शन परिसर १, २, पर्वती चाळ क्र. ५२ झोपडपट्टी, पर्वती दांडेकर पूल झोपडपट्टी, पर्वती दत्तवाडी, पर्वती इंदिरानगर झोपडपट्टी नीलामय टॉकीज १, २, शहर मध्यवर्ती भाग कसबा, नाना भवानी पेठ, कोंढवा बुद्रुक, काकडे वस्ती, कोंढवा बुद्रुक, नॉटिंग हिल सोसायटी, उंड्री, होलेवस्ती, कात्रज, सुखसागरनगर, अंबामाता मंदिर परिसर, कोथरूड, शिवतारा इमारत बधाई स्वीटजवळ, कोथरूड चंद्रगुप्त सोसायटी, महाराज कॉम्प्लेक्स मार्ग, पुणे स्टेशन, ताडीवाला रस्ता, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन दक्षिणेकडील वसाहत, घोरपडी, बालाजीनगर, विकासनगर, पर्वती, तळजाई वस्ती १, २, धनकवडी, बालाजीनगर, पर्वती शिवदर्शन १, २, धनकवडी, गुलाबनगर चैतन्यनगर, आंबेगाव खुर्द जांभूळवाडी,  साईसमृध्दी परिसर, वडगावशेरी, गणेशनगर, रामनगर, टेम्पो चौक, लोहगाव, कालवडवस्ती, बिबवेवाडी, आंबेडकरनगर, मार्केट यार्ड, गुलटेकडी, डायसप्लॉट, मीनाताई ठाकरेनगर, बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी स. नं. ६५०, गुलटेकडी, सेव्हन डे अ‍ॅडव्हेंटीज मिशन, बिबवेवाडी, ढोलेमळा झोपडपट्टी, प्रेमनगर झोपडपट्टी, येरवडा गांधीनगर, गांधीनगर २, ताडीगुत्ता, नागपूर चाळ, आदर्श इंदिरानगर, आळंदी रस्ता, फुलेनगर, आळंदी रोड, कळस, जाधववस्ती, येरवडा प्रभाग क्र. ६, हडपसर रामनगर, रामटेकडी, गोसावीवस्ती, वैदूवाडी, हडपसर सय्यदनगर १, २, ३, गुलामअलीनगर, कोंढवा खुर्द शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, तांबोळी बाजार, कोंढवा खुर्द मिठानगर, वानवडी एसआरपीएफ, शिवाजीनगर कामगार पुतळा, महात्मा गांधी झोपडपट्टी, पाटील इस्टेट, शिवाजीनगर रेल्वे लाइन उत्तरेकडील बाजू, शिवाजीनगर न. ता. वाडी, कामगार आयुक्त कार्यालयालगतची झोपडपट्टी, कॉँग्रेसभवन पाठीमागील बाजू, हडपसर चिंतामणीनगर, रेल्वे गेटजवळ, हडपसर आदर्श कॉलनी, वेताळनगर, सातववाडी, हडपसर माळवाडी, हांडेवाडी रस्ता, इंदिरानगर.

पिंपरी चिंचवड शहरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राची नावे 

खराळवाडी परिसर, पिंपरी, पीएमटी चौक परिसर, भोसरी, गुरूदत्त कॉलनी परिसर, भोसरी, रामराज्य प्लॅनेट परिसर, कासारवाडी, गणेश नगर परिसर, दापोडी, शास्त्री चौक परिसर, तनिष्का आर्किड परिसर, चºहोली, कृष्णराज कॉलनी परिसर, पिंपळे गुरव, नेहरूनगर बस डेपो परिसर, नेहरूनगर, कावेरीनगर पोलीस लाइन परिसर, वाकड, रूपीनगर परिसर तळवडे, गंधर्वनगरी परिसर मोशी, विजयनगर परिसर दिघी, तनिष्का आयकॉन परिसर दिघी, मधुबन सोसायटी परिसर, जुनी सांगवी, तपोवन रोड परिसर, पिंपरी वाघेरे, १६ नंबर बसस्टॉप परिसर, थेरगाव, शिवाजी चौक परिसर, पिंपळे निलख, इंदिरानगर परिसर चिंचवड, शुभश्री रो होऊस सोसायटी परिसर, पिंपळे सौदागर, साठ फुटी रोड परिसर, पिंपळे गुरव.

सकाळी दहा ते दुपारी दोन दवाखान्यांची वेळ

या झोनमध्ये जीवनावश्‍यक वस्तू आणि दवाखाने सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त गायकवाड यांनी 3 मे रोजी दिले होते. त्यानुसार या झोनमध्ये ही सुरू होती. परंतु या झोनमध्ये सेवा देणाऱ्या दुकानांच्या ठिकाणी देताना अथवा घेताना सामासिक अंतराचे (फिजिकल डिस्टसिंग) पालन होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या भागातील कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविणे आवश्‍यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आयुक्त गायकवाड यांनी आदेशात म्हटले आहे. त्यामुळे या प्रतिबंधित क्षेत्रात आता केवळ दवाखाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जीवनावश्‍यक वस्तूंसह सर्व प्रकाराची दुकाने रविवार दि. 17 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

प्रतिबंधित क्षेत्रात आवश्‍यकता भासल्यास दूध, भाजीपाला तसेच इतर आवश्‍यक वस्तूंचा पुरवठा पुणे महापालिका आणि पोलिस प्रशासन यांच्या वतीने घरपोच देणे अथवा या क्षेत्रात असलेल्या मोठ्या मोकळ्या जागेवर सुरक्षित अंतराचे पालन करून उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय लवकर घेण्यात येणार आहे, असेही आयुक्त गायकवाड यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com