पृथ्वीराज जाचकांची घरवापसी निश्चित? अजित पवारांशी जुळवून घेणार!

आगामी काळात एकत्रित काम करावे असा विचार करत पृथ्वारीज जाचक व अजित पवार यांनीही समन्वयाची भूमिका घेतली आहे. छत्रपती कारखान्याच्या सभासदांच्या हिताचा विचार करुन ही भूमीका घेतली गेली असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या मुळे लॉकडाऊननंतर जी निवडणूक होईल, त्यात चित्र काहीसे वेगळे दिसेल अशी चर्चा आहे
Prithviraj Jachak To Return to NCP
Prithviraj Jachak To Return to NCP

बारामती : पंचक्रोशीतील महत्वाची संस्था असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे राजकारण आगामी काळात वेगळ्या वळणावर जाणार आहे असे दिसते. कारखान्याचे माजी अध्यक्ष व राज्य सहकारी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी कारखान्याच्या हिताचा विचार करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

या माहितीलाअधिकृत दुजारो मिळालेला नसला तरी अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, पृथ्वीराज जाचक व किरण गुजर या चौघांची नुकतीच एक गोपनीय बैठक पार पडल्याचे समजते. या बैठकीत जाचक यांनी अजित पवार यांच्या समवेत छत्रपती साखर कारखान्यात कार्यरत व्हावे असे सांगण्यात आले आहे. आगामी निवडणूकीमध्ये त्यांना सन्मान्य जागा देण्याचा शब्द पवार यांनी जाचक यांना दिल्याचे समजते. 

आगामी काळात एकत्रित काम करावे असा विचार करत पृथ्वारीज जाचक व अजित पवार यांनीही समन्वयाची भूमिका घेतली आहे. छत्रपती कारखान्याच्या सभासदांच्या हिताचा विचार करुन ही भूमीका घेतली गेली असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या मुळे लॉकडाऊननंतर जी निवडणूक होईल, त्यात चित्र काहीसे वेगळे दिसेल अशी चर्चा आहे. 

आताच्या परिस्थितीत पृथ्वीराज जाचक यांनी कारखान्याचे व्यापक हित विचारात घेता कारखान्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावावी, असे त्यांना सांगण्यात आले आहे. कारखान्याच्या निवडणूकी दरम्यान एकत्र बसून जाचक यांचा योग्य सन्मान ठेवून त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपविली जाईल, असेही ठरले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

जाचक यांचा अनुभव दांडगा

ही प्रक्रीया गेल्या अनेक दिवसांपासून  सुरु होती, असेही समजते. या बाबत जाचक यांचा सहकारी साखर कारखानदारीतील अनुभव छत्रपती कारखान्यासाठी आवश्यक असल्याचे अनेक सभासदही बोलत होते. अजित पवार यांनीही कारखान्याचे हित विचारात घेत जाचक यांच्याशी जुळवून घेण्याची भूमिका घेतली आहे. या संदर्भात दत्तात्रय भरणे यांनाही विश्वासात घेण्यात आले असून किरण गुजर यांनी या प्रक्रीयेत समन्वयकाची भूमिका पार पाडल्याचे कळते.

राष्ट्रवादीला होऊ शकतो फायदा

पृथ्वीराज जाचक यांना सहकारी साखर कारखानदारीचा दांडगा अनुभव आहे. राज्य सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदासह अनेक महत्वाच्या जबाबदा-या त्यांनी यापूर्वी सांभाळलेल्या आहेत. छत्रपती साखर कारखान्याचीही त्यांना बारकाईने माहिती आहे. त्यांच्या अनुभवाचा राष्ट्रवादी कॉंग्रेससह छत्रपती कारखान्यासही फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पृथ्वीराज जाचक यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढविली होती आणि त्या नंतर सातत्याने ते पवारविरोधी भूमिका घेत आले होते. मात्र आता पुन्हा एकदा त्यांची 'घरवापसी' होणार हे स्पष्ट झाले आहे. 

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com