छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांनाच राजे मानतो : प्रकाश आंबेडकर - Prakash Ambedkar Tweets about Udayanraje Bhonsale | Politics Marathi News - Sarkarnama

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांनाच राजे मानतो : प्रकाश आंबेडकर

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा संघटनांत कलह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर इतरांचे आरक्षण रद्द करा, असे म्हणणे चुकीचे आहे. अशी मागणी करणारा राजा बिनडोक आहे. त्यांना भाजपने राज्यसभेवर कसे पाठवले? याचे मला आश्चर्य वाटते,'' अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी उदनराजेंवर टीका केली होती. 

पुणे : ''राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो. वंचित बहुजन आघाडीने घेतलेली भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूची आहे. पुतळे जाळा, काहीही केले तरी आम्ही आमची भूमिका व पक्षाची भूमिका बदलणार नाहीत. ही भूमिका वैचारिक आहे,आणि ती कायम राहील,'' असे ट्वीट करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती उदयनराजे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. 

''आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा संघटनांत कलह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर इतरांचे आरक्षण रद्द करा, असे म्हणणे चुकीचे आहे. अशी मागणी करणारा राजा बिनडोक आहे. त्यांना भाजपने राज्यसभेवर कसे पाठवले? याचे मला आश्चर्य वाटते,'' अशा शब्दात आंबेडकर यांनी टीका केली होती. 

आंबेडकर यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे पूर्वज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीसाठी हेच मराठे, राजे पुढे आले होते. त्यांच्या जडणघडणीत छत्रपतींचा मोलाचा मोठा वाटा आले, हे अॅड. आंबेडकरांनी विसरू नये, अशा शब्दांत नागपूरचे राजे श्रीमंत मुधोजी भोसले यांनी प्रकाश आंबेडकरांचा समाचार घेतला होता.

दरम्यान, 'सामना'च्या माध्यमातून शिवसेनेनेही आंबेडकर यांना फटकारले आहे. "जातीय आरक्षणांसाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू आहे. अशी भाषा करणारे राज्यातील तालेवार लोक आहेत. आता दसराही येत आहे. त्यामुळे शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्र नेमकी कोण काढतंय, शस्त्र कोणावर चालवली जातील, ते पाहावेच लागेल. प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरली व म्हणाले, 'एक राजे बिनडोक आहेत, तर दुसऱ्या राजांचे आरक्षण सोडून वेगळेच काही चालले आहे.' कोल्हापूर व सातारचे 'राजे' मराठा आरक्षणात उतरले आहेत. त्यावर श्री. आंबेडकर यांनी हे विधान केले. प्रश्न कोणी बिनडोक असण्याचा किंवा तलवारी चालविण्याचा नाही. जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करतील अशी स्थिती नाही,'' असे 'सामना'च्या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख