पूजा चव्हाण प्रकरणाला नवे वळण..ती दारू प्यायली की तिला पाजण्यात आली..?

पूजा चव्हाण हिने मद्यपाशन केले होते, असा जबाब तिच्या सोबत वास्तव्यास असलेला तिचा भाऊ व त्या भावाच्या मित्राने पोलिसांकडे दिला आहे.
puja13.jpg
puja13.jpg

पुणे : टिकटाँक स्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यूच्या कारणांचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. 'पहिल्या मजल्यावरून पडलेली पूजा चव्हाण हिने मद्यपाशन केले होते, असा जबाब तिच्या सोबत वास्तव्यास असलेला तिचा भाऊ व त्या भावाच्या मित्राने पोलिसांकडे दिला आहे,' अशी माहिती वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिपक लगड यांनी दिली आहे. त्यामुळे पूजाच्या मृत्यूबाबत पुन्हा निराळ्या शंका सुरू झाल्या असून तिनं दारू पिली होती की तिला दारू पाजण्यात आली होती, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  

पूजा चव्हाण हिच्या मृत्यूच्या कारणांचा तपास पोलिसांनी सुरू केला असून तिचा मृत्य म्हणजे आत्महत्याच आहे, असे नोंदविलेले नाही हे स्पष्ट करण्यात आले. तसेच तिच्या मृत्यूबाबत सोशल मीडियात व्हायरल झालेल्या आँडिओ क्लिप पोलिसांनाही मिळाल्या आहेत. त्यातील बऱ्याच क्लिप या बंजारा बोलीत असल्याने त्याच्या भाषांतराचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

पूजा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडल्याने रविवारी (ता. आठ फेब्रुवारी) तिचा मृत्य झाला. महम्मदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीतील फ्लॅटमधअये पूजा हि तिचा भाऊ आणि भावाचा मित्र यांच्यासोबत राहत होती. मूळ परळी वैजनाथ येथील असलेली पूजा ही स्पोकन इंग्रजीच्या क्लाससाठी पुण्यात महिनाभरापूर्वी आल्याचे पोलिसांनी सांगितले होते. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ती गॅलरीतून पडली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. तिचा भाऊ विलास चव्हाण व अरूण राठोड यांनी तिला तेव्हा तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला. पोलिसांच्या दाव्यानुसार तिच्या आईवडिलांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. मात्र, ती काही गंभीर आजाराने त्रस्त असल्याने तिने उडी मारली असावी, असा पोलिसांना जबाब देण्यात आला. सुरवातीपासून तिची आत्महत्या म्हणून सर्वत्र चर्चा आहे. पण पोलिसांनी कायदेशीरदृष्ट्या आत्महत्या म्हणून शिक्कामोर्तब केलेले नाही आणि ते प्रकरण बंदही केलेले नाही. 

वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिपक लगड यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ महिन्यापूर्वी ही तरुणी पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी आली होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला. आई-विडीलांचा जबाब घेतला असता त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही. मात्र ती सोरायसीस या आजाराने त्रस्त असल्याने तिने आत्महत्याचे पाऊल उचलले असावे. घटनास्थळी सुसाईड नोट आढळून आली नाही.

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये ट्रीटमेंट करण्याबाबत संबंधित मंत्री आणि राठोड यांच्यात संवाद आहे. ते  नेमके कुठल्या ट्रिटमेंटबद्दल चर्चा झाली, याचे गूढ उकलण्याचा प्रयत्न आता केला जात आहे. आज व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये दोन व्यक्तींचे बंजारा भाषेतील संभाषण आहे, ज्यामध्ये एक तरुणी आत्महत्येचा विचार करतेय असे संभाषण आहेत. तो आवाज संबंधित मंत्र्याचा असल्याचा दावा केला जात आहे. या व्यक्ती कोण आहेत? अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, या ऑडिओचा फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावरच त्याची सत्यता समोर येईल. ही ऑडिओ क्लिप पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधित असल्याची चर्चा सुरू आहे. ही ऑडिओ क्लिप खरी आहे का, याची तपासणी होईलच. पण तोपर्यंत  या 22 वर्षाच्या पूजाने आत्महत्या का केली असेल? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
 
Edited  by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com