सरदार घराणे पलांडे-इनामदारांच्या मुखईत सुर्यकांत पलांडे-जयश्री पलांडेंच्या पॅनलचा धुव्वा

शिरुर तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात दबदबा असलेले सरदार घराणे पलांडे-इनामदारांच्या मुखई (ता.शिरूर) येथे माजी आमदार सुर्यकांत पलांडे, जिल्हा बॅंकेच्या माजी संचालिका जयश्री पलांडे यांच्या मार्गदर्शनाखालील स्वाभिमानी गावकरी पॅनलचा स्थानिक ग्रामपंचायत निवडणूकीत धुव्वा उडाला.
Suryakant Palande - Jayashree Palande
Suryakant Palande - Jayashree Palande

शिक्रापूर : शिरुर तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात दबदबा असलेले सरदार घराणे पलांडे-इनामदारांच्या मुखई (ता.शिरूर) येथे माजी आमदार सुर्यकांत पलांडे, जिल्हा बॅंकेच्या माजी संचालिका जयश्री पलांडे यांच्या मार्गदर्शनाखालील स्वाभिमानी गावकरी पॅनलचा स्थानिक ग्रामपंचायत निवडणूकीत धुव्वा उडाला. विशेष म्हणजे जेमतेम २२०० मतदानाच्या या गावात वरील दोन्ही बड्या नेत्यांशिवाय एकत्र आलेल्या इतर पलांडे, धुमाळ, थोरवे परिवारांनी ६:३ अशी 'फळीफोड बारी’ ठेवून दिली.  

फरडे वक्ते, स्पष्ट स्वभावाचे आणि देशाचे नेते शरद पवार यांचेशी थेट घनिष्ठ असलेले माजी आमदार सुर्यकांत पलांडे-इनामदार यांचे गाव म्हणजे मुखई. याच गावात भाजपाकडून दोन वेळा विधानसभा लढलेल्या, राष्ट्रवादीकडून जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षा राहिलेल्या व सध्या शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या असलेल्या जयश्री पलांडे-इनामदार यांचाही राजकीय दबदबा तालुका-जिल्ह्यात अद्यापही कायम आहे. यावेळी हे दोन्ही नेते एकत्र आले आणि त्यांनी गावात स्वाभिमानी गावकरी पँनल केले. 

या पॅलच्या विरोधात यावेळी घोडगंगाचे तज्ञ संचालक अ‍ॅड.सुरेश रामचंद्र पलांडे, माजी सरपंच सुरेश रामराव पलांडे, अतुल प्रल्हाद धुमाळ, सुभाष संभाजीराव पलांडे, सुदाम मुरलीधर थोरवे व युवा नेते सचिन पलांडे यांनी श्री काळभैरवनाथ ग्रामविकास आघाडी नावाने पॅनल टाकला. सुरवातीला दोन जागा बिनविरोध झाल्यावर सात जागांसाठी निवडणूक पार पडली. गंमत म्हणजे बिनविरोध महेंद्र शानूर काळे व सौ.संगीता रमेश पलांडे-इनामदार हे दोन्ही उमेदवार अनुक्रमे दोन्ही पॅलनकडे गेले. पर्यायाने उर्वरित सात जागांसाठीच्या निकालानंतर काळभैरवनाथ ग्रामविकास आघाडी पॅनलने बिनविरोध एका जागेसह सहा जागांवर बाजी मारली तर एका बिनविरोध सदस्यासह स्वाभिमानी गावकरी पॅनलला जेमतेम तीन सदस्यांवर समाधान मानावे लागले.

दरम्यान सन २०१० मध्ये सुर्यकांत पलांडे यांना माजी सरपंच अतुल धुमाळ यांच्या समवेत टाकलेल्या पॅनलला यश मिळवून ग्रामपंचायतीवर सत्ता प्रस्थापित झाली होती. पुढे सन २०१५ च्या निवडणूकीत माजी सरपंच अतुल धुमाळ हे अ‍ॅड.सुरेश रामचंद्र पलांडे हे दोघेच एका बाजुला तर वरील सर्व नेते त्यांच्या विरोधात असताना पुन्हा धुमाळ यांच्याच पॅनलने सत्ता प्रस्थापित केली होती. यावेळी पुन्हा धुमाळ यांच्या समवेत माजी आमदार सुर्यकांत पलांडे व शिवसेना नेत्या जयश्री पलांडे यांच्या शिवाय गावातील सर्व गावकारभारी राहिल्याने श्री काळभैरवनाथ ग्रामविकास आघाडी सत्ता प्रस्थापित झाली. दरम्यान बिहार युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू डॉ.पंडितराव पलांडे यांचे पुतणे सुमित पलांडे हे सुर्यंकांत पलांडे यांच्या पॅनलकडून विजयी होवून पहिल्यांदाच गावच्या राजकारणात प्रवेशकर्ते झाले.  

दोन्ही पॅनलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे.
श्री काळभैरवनाथ ग्रामविकास आघाडी : सौ.सोनल सचिन जगताप, सौ.संयोगीता तानाजी पलांडे, महेंद्र शानूर काळे (बिनविरोध निवड), सौ.वर्षा गणेश रामगुडे, सौ.ज्योती सचिन पलांडे व रमेश रामचंद्र पलांडे.
स्वाभिमानी गावकरी पँनल : सुमीत विनायक पलांडे, सौ.सुनिता शरद हिरवे व सौ.संगिता रमेश पलांडे (बिनविरोध निवड)
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com