No Invitation of Maratha Reservation Meeting Say Devendra Fadanavis | Sarkarnama

मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकीचे निमंत्रण नाही : देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

फडणवीस यांच्या अनुपस्थितीमुळे ही बैठक रद्द होणार असे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. त्यावर फडणवीस यांच्या कार्यालयाने वरीलप्रमाणे स्पष्टीकरण दिले आहे. मी बिहारमध्ये असलो तरीही सायंकाळी बैठकीला उपस्थित राहू शकतो. मात्र, अद्याप आपल्याला बैठकीचे निमंत्रणच आलेले नाही, असे फडणवीस यांच्या वतीने सांगण्यात आले आहे

मुंबई : महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणा संदर्भात आज सर्वपक्षीय बैठक बोलवल्याची चर्चा होती. मात्र, या बैठकीचे निमंत्रण मला मिळालेले नाही मी बिहारमध्ये असलो तरी आज सायंकाळपर्यंत मुंबईत येणार आहे. त्यामुळे माझ्या अनुपस्थितीमुळे मराठा आरक्षणाची बैठक रद्द होणार असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत, असे स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

फडणवीस यांच्या अनुपस्थितीमुळे ही बैठक रद्द होणार असे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. त्यावर फडणवीस यांच्या कार्यालयाने वरीलप्रमाणे स्पष्टीकरण दिले आहे. मी बिहारमध्ये असलो तरीही सायंकाळी बैठकीला उपस्थित राहू शकतो. मात्र, अद्याप आपल्याला बैठकीचे निमंत्रणच आलेले नाही, असे फडणवीस यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्याशी मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली होती. फडणवीस यांनी या आरक्षणाला पूर्ण पाठिंबा दिला होता. स्वतः मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधताना ही बाब स्पष्ट केली होती. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केली आहे.देवेंद्र फडणीस मुंबईत येतील, त्या वेळी त्यांच्याशीही चर्चा करण्यात येणार आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय घेऊ. याबाबत कायदेशीर सल्ला घेण्यात आला आहे आणि इतरांकडून मुख्यमंत्र्यांनी याबाबत पर्याय समजून घेतले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काल दिली होती. मराठा आरक्षणासंदर्भात विविध संघटनांनी राज्य सरकारला सूचना केलेल्या आहेत. अंतिम जे काय करायचे असेल, ते कायदेशीर विचार घेऊन केले जाईल. फडणवीस आल्यानंतर त्यांच्याशी देखील चर्चा करण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले होते.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख