तुम्ही काय श्रावणबाळ जन्माला घातलाय का? नितेश राणेंचा उद्धवना सवाल - Nitesh Rane Attacks Uddhav Thackeray through Tweet | Politics Marathi News - Sarkarnama

तुम्ही काय श्रावणबाळ जन्माला घातलाय का? नितेश राणेंचा उद्धवना सवाल

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

भाजपला आजचा शिवसेनेचा महाविजयी दसऱ्याच्या मेळावा चागला झोंबला आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाला प्रतिउत्तर देत आमदार नितेश राणे यांनी ट्वीटरवरुन त्यांच्यावर हल्ला चढवला आहे

पुणे : भाजपला आजचा शिवसेनेचा महाविजयी दसऱ्याच्या मेळावा चागला झोंबला आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाला प्रतिउत्तर देत आमदार नितेश राणे यांनी ट्वीटरवरुन त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. हवा जास्तच भरलेली दिसतेय. टाचणी तयार आहे. फक्त योग्य वेळ येऊ द्या, असे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे. 

''काही जणांनी तोंडात शेण भरून गोमूत्राच्या गुळण्या ठाकरे कुटुंबावर केल्या. त्यांना मी सांगतो की, त्यांनी आता ते गिळावे अन गप्प बसावे. कारण आमचे हात स्वच्छ आहेत. स्वत: शेण खायचे आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा अशी यांची पद्धत आहे,'' असे ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले होते. ठाकरे यांचा रोख अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करणाऱ्या भाजप नेत्यांवर होता.  

''मध्यंतरी एक अभिनेत्याचा मृत्यू झाला. लगेच तो बिहारचा पुत्र झाला. यानंतर मुंबई पोलिसांना लक्ष्य करण्यात आले. राज्यात कायदा व सुव्यवस्था नाही. मुंबई पोलीस निक्कमे आहेत, अशी टीका करण्यात आली. महाराष्ट्रात सगळीकडे गांजाची शेतीची सुरू असल्यासारखे चित्र रंगवण्यात आले. बिहारचा पुत्राच्या मृत्यूत काही काळबेर असेल ते शोधून काढा. परंतु, त्याच्या नावाने गळे काढणारे महाराष्ट्रावर चिखलफेक करीत आहेत,'' अशी टीकाही उद्धव यांनी केली होती.

त्यावर ''दुसऱ्याची पिल्लं वाईट, मग यांनी के त्या dino च्या खुशीत नशा करून मुलीवर अत्याचार करणारा श्रावण बाळ जन्माला घातला आहे का, असाही खोचक सवाल नितेश यांनी केला बिहारच्या आगोदरच  पक्ष प्रमुखांनी व्हॅक्सिन घेतलेले दिसते, जास्तच हवा भरलेली आज, किती आव टाचणी तयार आहे फक्त योग्य वेळ येऊ द्या, असे नितेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

''इतकी खुम खुमी आहे ना मग ती Disha Salain ची केस मुंबई पुलिस वर कुठला ही दबाव न टाकता निपक्षपाती चौकशी करुन दया.. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!'' असाही चिमटा नितेश यांनी काढला आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख