पुणे विभागात 93 हजार पदवीधरांची अवैध ठरलेली नोंदणी कुणाच्या पथ्यावर ? - Ninty three Thousand Graduates Not valid for voting | Politics Marathi News - Sarkarnama

पुणे विभागात 93 हजार पदवीधरांची अवैध ठरलेली नोंदणी कुणाच्या पथ्यावर ?

उमेश घोंगडे
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

पुणे पदवीधर मतदारसंघातून विविध राजकीय पक्ष व संभाव्य उमेदवारांनी नोंदणी केलेल्या पदवीधर मतदारांपैकी सुमारे 93 हजार मतदारांची नोंदणी अवैध ठरविण्यात आली आहे.

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघातून विविध राजकीय पक्ष व संभाव्य उमेदवारांनी नोंदणी केलेल्या पदवीधर मतदारांपैकी सुमारे 93 हजार मतदारांची नोंदणी अवैध ठरविण्यात आली आहे.

नोंदणी केलेल्या पदवीधरांची संख्या चार लाख 57 हजार होती. मात्र, निवडून आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार प्रत्यक्षात मतदानासाठी तीन लाख 65 हजार 358 मतदार प्रत्यक्ष मतदान करू शकणार आहेत. नोंदणी केलेल्या पदवीधरांपैकी तब्बल 93 हजार मतदार कमी झाल्याने याचा फटका कुणाला बसणार यावर तर्कविर्क सुरू झाले आहेत.

मोठ्या संख्येने अवैध ठरविण्यात आलेल्या मतदारांमुळे पदवीधर मतदारसंघात कुणाला फटका बसणार तर कुणाचा फायदा होणार याचे आडाखे बांधले जाऊ लागले आहेत. पुणपदवीधर मतदारसंघात मुख्य लढत ही महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड विरूद्ध भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संग्राम देशमुख अशीच होणार आहे.आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. पदवीधर मतदारसंघातून आज 16 तर शिक्षक मतदारसंघातून 15 उमेदवारांनी माघार घेतली. पदवीधरसाठी रिंगणात 62 तर शिक्षक मतदारसंघासाठी 35 उमेदवार उरले आहेत.

पुणे विभागात पदवीधरसाठी मनसेसह अनेक उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड विरूद्ध भाजपाचे संग्राम देशमुख यांच्या रंगणार आहेत. अर्ज माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवशी आज दोन्ही प्रमुख उमेदवारांनी पक्षातील बंडखोरी टाळण्यात यश मिळविले. पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. भाजपाकडून चंद्रकांत पाटील यांच्याकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. गेल्यावेळी पाटील यांनी अटीतटीच्या लढतीत ही निवडणूक जिंकली होती. गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून सारंग पाटील हे चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उभे होते. मात्र, महाविकास आघाडीचे विद्यमान उमेदवार अरूण लाड यांनी गेल्यावेळी बंडखोरी करून तब्बल 28 हजार मते मिळविली होती.

 

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख


पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी नोंदणी केलेले एकूण पात्र मतदार
जिल्हा  पदवीधर शिक्षक
पुणे 85,619 30002
सातारा 56,126 7,426
सांगली 86,736 6,732
सोलापूर 48,949 12379
कोल्हापूर 87,958 11998
एकूण 3,65,358 68537