नवनिर्वाचित गावकारभाऱ्यांच्या गर्दीने भरणेवाडीला जत्रेचे स्वरूप  - Newly elected Gram Panchayat members of Indapur taluka felicitated at Bharnewadi | Politics Marathi News - Sarkarnama

नवनिर्वाचित गावकारभाऱ्यांच्या गर्दीने भरणेवाडीला जत्रेचे स्वरूप 

राजकुमार थोरात
रविवार, 24 जानेवारी 2021

लासुर्णेमधील कार्यकर्त्यांनी दुचाकीवरुन रॅली काढत भरणेवाडी गाठली.

वालचंदनगर (जि. पुणे) : इंदापूर तालुक्‍यातील 60 ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच संपल्या. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून वर्चस्वाचे दावे प्रतिदावे सुरु आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने तालुक्‍यातील 37 ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. दरम्यान, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आज (ता. 24 जानेवारी) आयोजित करण्यात आला होता. सत्कारासाठी नवनिर्वाचित सदस्यांनी विविध गावांतील प्रमुख पुढाऱ्यासह गर्दी केली होती, त्यामुळे भरणेवाडीला जत्रेचे स्वरुप आले होते. 

इंदापूर तालुक्‍यातील 60 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच संपली. या 60 ग्रामपंचायतीत 610 नवनिर्वार्चित सदस्य बनले आहेत. ग्रामपंचायतीवरील वर्चस्वाचे भाजप-राष्ट्रवादीकडून दावे प्रतिदावे सुरु आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने तालुक्‍यातील 37 ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभाचे आज भरणेवाडीत आयोजन केले होते. 

सत्कारासाठी नवनिर्वाचित सदस्यांनी गावातील प्रमुख पुढाऱ्यांसह गर्दी केली होती. भरणेवाडीला गर्दीमुळे जत्रेचे स्वरुप आले होते. भरणेवाडीकडे येणाऱ्या रस्त्यावर गर्दी झाल्याने काही वेळ वाहतूकही ठप्प झाली होती. सकाळी आठपासुन सत्कारच्या कार्यक्रमास सुरूवात झाली. गावानूसार ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. 

या वेळी भरणे यांनी सर्व सदस्यांना शुभेच्छा देवून गावासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले. तसेच राष्ट्रवादील दिलेल्या मतांबद्दल जनतेचे आभारही मानले. 

लासुर्णे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. लासुर्णेमधील कार्यकर्त्यांनी दुचाकीवरुन रॅली काढत भरणेवाडी गाठली. लासुर्णेकरांच्या दुचाकीची रॅलीने तालुक्‍यातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. 

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, सदस्य वैशाली प्रतापराव पाटील, अभिजित तांबिले उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख