बांदलांना धूळ चारत शिक्रापुरात राष्ट्रवादीची बाजी; राजकीय वारस पहिल्याच निवडणुकीत पराभूत 

बांदलांच्या विरोधात करंजे-मांढरे-जकाते गटाला एकहाती सत्ता मतदारांनी सुपूर्त केली आहे.
NCP's victory in Shikrapur by defeating Mangaldas Bandal
NCP's victory in Shikrapur by defeating Mangaldas Bandal

शिक्रापूर (जि. पुणे) : शिरूर तालुक्‍यात राजकीयदृष्ट्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रस्थापित मंगलदास बांदल गटाला धोबीपछाड देत मांढरे-करंजे-जकाते गटाने 9 : 7 अशी बाजी मारली. विशेष म्हणजे बांदल गटाकडून माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांचा चेहरा पुढे करून, तर बांदलांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांचा पुतण्या निखील प्रतापराव बांदल यांना उमेदवारी देवून निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, सासवडे-बांदल या दोघांनाही पराभवाला सामोरे जावे लागल्याने शिक्रापूर ग्रामपंचायतीवर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आली आहे. 

मागील पंचवार्षिकला 9 : 8 अशा बलाबलाने सत्ता गमावलेल्या बांदल गटाने पुढील अडीच वर्षातच पुन्हा ग्रामपंचायतीवर सत्ता प्रस्थापित केली होती. मंगलदास बांदल यांच्या राजकीय खेळ्यांनी जिल्ह्याचे राजकारण गाजविल्याने शिक्रापूरची सत्ता बांदलांकडे येणे, अपेक्षित होते. मात्र, शिक्रापुरातील माजी सरपंच आबासाहेब करंजे, बापूसाहेब जकाते, बाजार समिती संचालक आबाराजे मांढरे, बाबासाहेब सासवडे व घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक अरुण करंजे यांनी एकत्र येवून बांदल गटाला शह देत 10: 6 अशी बाजी मारली. 

दरम्यान, बांदलांचा राष्ट्रवादीतील वावर हा चर्चेचा विषय असे. बांदल हे राष्ट्रवादीत राहून पक्षाच्या विरोधात काम करत असल्याच्या तक्रारी तालुक्‍यातील इतर नेतेमंडळींकडून होत असतात. सद्यस्थितीत बांदल राष्ट्रवादीत नसल्याने शिक्रापूर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. 

दरम्यान, बांदल गटाला सर्वात मोठा धक्का वॉर्ड नं. 1 मधील माजी सरपंच रामभाऊ सासवडे, बांदलांचे पुतणे निखिल बांदल आणि भाजपचे नेते राजाभाऊ मांढरे यांच्या पत्नी भारती राजाभाऊ मांढरे यांच्या पराभवामुळे बसला. सासवडे यांचा पराभव करंजे कुटुंबातील उच्चशिक्षित उद्योजक मयूर करंजे यांनी, तर निखील बांदल यांचा पराभव सुभाष खैरे यांनी केला. या शिवाय करंजे परिवारालाही वॉर्ड क्रमांक 2 मध्ये गौरव करंजे यांच्या पराभवाचा फटका बसला आहे.

एकंदरीत 9 : 7 अशा फरकाने बांदलांना धोबी पछाड देत राष्ट्रवादीने ही ग्रामपंचायत जिंकली आहे. उषा तानाजी राऊत या यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्याने राऊतही करंजे-मांढरे-जकाते गटाला मिळण्याची शक्‍यता आहे. बांदलांच्या विरोधात करंजे-मांढरे-जकाते गटाला एकहाती सत्ता मतदारांनी सुपूर्त केली आहे. 

विजयी उमेदवार : करंजे-मांढरे-जकाते गट : मयूर करंजे, वंदना भुजबळ, सारिका सासवडे, पुजा दीपक भुजबळ, विशाल खरपुडे, रमेश थोरात, सीमा लांडे, सुभाष खैरे, मोहिनी संतोष मांढरे 
बांदल गट : कृष्णा सासवडे, मोहिनी युवराज मांढरे, शालन राऊत, त्रिनयन कळमकर, प्रकाश वाबळे, कविता टेमगिरे, रमेश गडदे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com