लोणी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या माधव काळभोर गटाची सत्ता; शिवसेनेला धोबीपछाड 

गेल्या वेळी या दोघांनी एकत्रितपणे निवडणूक लढवून सत्ता काबीज केली होती.
NCP's Madhav Kalbhor group won Loni Kalbhor Gram Panchayat
NCP's Madhav Kalbhor group won Loni Kalbhor Gram Panchayat

पुणे : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या 17 जागांपैकी 13 जागा जिंकत यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माधव काळभोर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलने परिवर्तन घडविले. शिवसेनेचे हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर यांच्या सत्ताधारी अष्टविनायक पॅनेलला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले. 

लोणी काळभोर ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात येथील दोन गटांत हाणामारी झाली होती. अत्यंत चुरशीने लढल्या गेलेल्या या निवडणुकीत माधव काळभोर यांच्या गटाने बाजी मारली. यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास काळभोर, साधना सहकारी बॅंकेचे ज्येष्ठ संचालक सुभाष काळभोर, बाजार समितीचे माजी संचालक शिवदास काळभोर यांच्या परिवर्तन पॅनेलने 13 जागा जिंकत ग्रामपंचायतीवर निर्विवाद सत्ता मिळविली. 

शिवसेनेचे हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर यांच्या गटाची सत्ता लोणी काळभोर ग्रामपंचायतीवर होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. मतदारांना त्यांना या वेळी साफ नाकारत विरोधी गटाकडे गावची सत्ता दिली आहे. 

परिवर्तन पॅनेलचे प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार योगेश काळभोर सर्वांधिक मताने विजयी झाले, तर त्याच पॅनेलच्या प्रभाग क्रमांक 6 च्या संगीता काळभोर या सर्वात कमी म्हणजेच एका मतानी विजयी झाल्या. माधव काळभोर यांनी प्रशांत काळभोर यांच्याकडून सत्ता खेचून घेतली. विशेष म्हणजे गेल्या वेळी या दोघांनी एकत्रितपणे निवडणूक लढवून सत्ता काबीज केली होती. मात्र, सत्तेच्या कुरबुरीने माधव काळभोर यांनी प्रशांत काळभोर यांची साथ सोडत स्वतंत्रपणे पॅनेल लढवून सत्ता खेचून आणली. 

इंदापुरात हर्षवर्धन पाटलांना धक्का : निमगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता 

इंदापूर ः राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या इंदापूर तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालात राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिल्या फेरीत जोरदार मुसंडी मारली आहे. निमगाव केतकी ग्रामपंचायतीत दहा वर्षानंर परिर्वतन झाले असून भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटाकडे असलेली ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे आली आहे. येथील 9जागा राष्ट्रवादीने, तर पा जागा भाजपने जिंकल्या आहेत. पहिल्या फेरीत काटी, तरंगवाडी, शहा यांसह 37 ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने निर्णायक आघाडी घेतली आहे. निकालाचा कल असाच कायम राहिला तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जाईल. 

इंदापूर तालुक्‍यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या निमगाव केतकी ग्रामपंचायतीत दहा वर्षांनंतर परिवर्तन झाले आहे. पाटील गटाकडे असलेली ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या 17 पैकी14 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यातील 9 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत, तर पाच भाजपच्या वाट्याला गेल्या आहेत. ही ग्रामपंचायत पूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या गटाकडे होती. 

काटी ग्रामपंचायत ही पूर्वी हर्षवर्धन पाटील गटाकडे म्हणजेच कॉंग्रेसकडे होती. या वेळी ही ग्रामपंचायत कॉंग्रेसकडून राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. ग्रामपंचायतीच्या 13 जागांपैकी सात जागा जाहीर झाल्या आहेत. यातील 5 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत, तर 2जागा भाजपने जिंकल्या आहेत. या ठिकाणी परिवर्तन अटळ आहे. 

तरंगवाडी ग्रामपंचायतीच्या 9 जागांपैकी 9 ही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. शहा ग्रामपंचायतीमध्ये काट्याची टक्कर आहे. येथील 5 जागा राष्ट्रवादीकडे, 4 भाजप जागा राष्ट्रवादीकडे गेल्या आहेत. गोतोंडीमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीने पाच जागा जिंकत आघाडी घेतली असली तरी भाजप आणि अपक्षांनी या ठिकाणी राष्ट्रवादीला कडवी लढत दिली आहे. या ठिकाणी भाजप आणि अपक्षांनी प्रत्येकी चार जागा जिंकल्या आहेत. गोतोंडी ग्रामपंचायतीच्या सत्तेची चावी अपक्षांच्या असणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com