लबाड लांडगं ढोंग करतंय, मी पुन्हा येईनचं सोंग करतंय!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरूनमहाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
NCP Leader Rupali Chakankar attacks on Devendra Fadanvis Over OBC ReservationNCP Leader Rupali Chakankar attacks on Devendra Fadanvis Over OBC Reservation
NCP Leader Rupali Chakankar attacks on Devendra Fadanvis Over OBC ReservationNCP Leader Rupali Chakankar attacks on Devendra Fadanvis Over OBC Reservation

पुणे : ओबीसी आरक्षणासाठी भाजपने शनिवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी हल्ला चढवला असून फडणवीस यांना थेट लंबाड लांडगा असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. (NCP Leader Rupali Chakankar attacks on Devendra Fadanvis Over OBC Reservation)

चाकणकर यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. फडणवीस यांनी 'आमच्या हाती सत्ता द्या, चार महिन्यांत आरक्षण देतो. नाही दिलं तर राजकीय संन्यास घेईन,' असं वक्तव्य केलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही फडणवीसांना टोला लगावला आहे. आता चाकणकर यांनी ट्विट करून फडणवीसांवर टीका केली आहे.  

'फडणवीस एकटेच संन्यास घेणार आहेत की मोदीजींना ही सोबत नेणार आहेत? ओबीसी आरक्षणाचा बळी देण्यात दोघांचा वाटा आहे म्हणून विचारलं. लबाड लांडगा ढोंग करतंय, ओबीसींचे नाव घेऊन मी पुन्हा येईन च सोंग करतंय...,' असं ट्विट चाकणकर यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी चाकणकर आणि फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात जोरदार ट्विटर वॅार सुरू होतं. 

दरम्यान, फडणवीसांच्या वक्तव्याबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले, मला सत्ता द्या, चार महिन्यांत आम्ही ओबीसींची प्रश्न सोडवतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. जर ओबीसींविषयी कळवळा असेल तर कसा सोडवणार हे मला सांगा मीच प्रश्न सोडवतो. तुम्ही सत्तेत येण्याची काही गरज नाही कारण महाराष्ट्रानं तुम्हाला नाकारलं आहे. पण सत्ता आल्याशिवाय मी महाराष्ट्रासाठी काहीच करणार नाही. सत्ता आली की मी सगळं काही करेन. सत्ता मिळेपर्यंत मी महाराष्ट्रातील जनतेला काहीही मदत करणार नाही, ही भावना खऱ्या लोकप्रतिनिधीची आहे असं मला वाटत नाही. 

भुजबळांनी आता त्यांना विनंती केली आहे की, तुमच्याकडं जर पर्याय असेल तर ओबीसींचं नेतृत्व करा. पण फडणवीस म्हणतात, मला सत्ता द्या मी प्रश्न सोडवतो. सत्ता तुम्हाला आली तर काम करणार, नाही तर करणार नाही, हा हट्ट महाराष्ट्रात कुठल्या नेत्यानं केला नव्हता, असा टोला पाटील यांनी लगावला. 

ओबीसी समाजाबद्दल भाजपला आता केवढा कळवळा आला आहे. छगन भुजबळ यांना दोन-अडीच वर्षे तुरूंगात खितपत पडून राहावं लागलं. त्यांना किती यातना दिल्या. एकनाथ खडसेंना पक्षातून बाहेर जाण्याची परिस्थिती निर्माण केली. भाजपमध्ये ओबीसी नेता राहणार नाही आणि ओबीसींच्या माध्यमांतून जी प्रगती ओबीसी नेते करत होते, ही चळवळच मारण्याचं काम भाजपच्या अंतर्गत होत होतं. आता त्यांनी रस्त्यावर येऊन भाजपने आंदोलन करणं हे प्रचंड हास्यास्पद आहे, असं पाटील म्हणाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com