पदवीधर साठी राष्ट्रवादीकडून पुण्यात अरुण लाड, औरंगाबादमधून सतीश चव्हाण

विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागातून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण तर पुणे विभागातून अरुण लाड यांच्या नावाची घोषणा महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
Satish Chavan - Arun Lad
Satish Chavan - Arun Lad

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागातून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण तर पुणे विभागातून अरुण लाड यांच्या नावाची घोषणा महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार कधी जाहीर करणार याची उत्सुकता लागली असतानाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सतीश चव्हाण आणि अरुण लाड यांच्या नावाची घोषणा केली आहे.राष्ट्रवादीने जाहीर केलेले दोन्ही उमेदवार या निवडणूकीत विजयी होतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने आपली यादी जाहीर केली आहे. औरंगाबाद पदवीधर मतदार संघातू शिरीष बोरालकर, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख, नागपूर विभागातून  संदिप जोशी आणि अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातून नितीन धांडे यांची नांवे जाहीर झाली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील पदवीधर मतदार आपला प्रतिनिधी विधान परिषदेवर पाठविणार आहेत.

मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी अपेक्षेप्रमाणे भाजपने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून बोराळकर यांच्यासह घुगे, शितोळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी देखील उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. परंतु बोराळकर यांनी या सर्वांवर मात करत उमेदवारी मिळवली. फडणवीस यांचे समर्थक म्हणून बोराळकर ओळखले जातात. २०१४ मध्ये बोराळकर यांनी पदवीधरची निवडणूक लढवली होती. पण तेव्हा राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला होता. आता पु्न्हा या दोघांमध्ये लढत होणार आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com