राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रविराज तावरेंवर बारामतीत गोळीबार

हा हल्ला राजकिय वैमनस्यातून झाल्याचे तावरे यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
NCP activist Raviraj Taware on firing in Baramati
NCP activist Raviraj Taware on firing in Baramati

माळेगाव (जि. पुणे) : बारामती तालुक्यातील माळेगाव-पणदरे गटच्या जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रविराज सदाशिव तावरे (वय 41) यांच्यावर माळेगाव येथील संभाजीनगर येथे दोघा अज्ञातांनी गोळीबार केला. रविराज यांच्या छातीमध्ये एक गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. ही घटना आज सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली असून तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. हा हल्ला राजकिय वैमनस्यातून झाल्याचे तावरे यांच्या नातेवाईकांनी सांगितले. (NCP activist Raviraj Taware on firing in Baramati)

दरम्यान, माळेगाव बुद्रूक येथील संभाजीनगर येथे रविराज व त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे आपल्या मोटारीतून निघाले होते. ते वडापाव घेण्यासाठी थांबले असता त्यांच्यावर अज्ञात मोटारसायकस्वारांनी अचानकपणे येऊन गोळीबार केला. त्यानंतर ते पळून गेले. हा प्रकार पाहून रोहिणी तावरे ह्या मोठ्याने ओरडल्या. ते ऐकून समोर क्रिकेट खेळत असलेल्या मुलांनी रविराज यांना तातडीने वैद्यकिय उपचार मिळविण्यासाठी बारामती येथील खासगी रुग्णालयात पोचविले. त्या मदत कार्यात दादा जराड, समीर घोरपडे यांनी महत्वाची भूमिका बजावली. 

या घटनेबाबत माहिती देताना जराड म्हणाले, की सुरुवातीला आम्हाला वाटले रविराज तावरे यांच्या गाडीचा अपघात झाला, परंतु नंतर कळाले की त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यांच्यावर कोणी गोळीबार केला, हे पाहण्यापेक्षा आम्ही रविराज तावरे यांना तातडीने पुढील वैद्यकिय उपचार मिळण्याला प्राधान्य दिले.

या घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक महेश ढवाण, सहायक पोलिस निरीक्षक महेश विधाते यांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच त्यांनी बारामतीत वैद्यकिय उपचार घेत असलेले जखमी तावरे यांची प्रकृतीची माहिती घेतली. दरम्यानच्या कालावधीत माळेगावसह तालुक्यातील पदाधिकारी, कार्य़कर्त्यांनी बारामती रुग्णालय परिसरात  गर्दी केल्याचे दिसून आले. 
 
अजित पवारांनी घेतली दखल; रोहित पवार चौकशीसाठी रुग्णालयात


राष्ट्रवादीचे कार्य़कर्ते रविराज तावरे यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळल्यानंतर  कळविण्यात आली. त्यांनी जखमी रविराज तावरे यांना तातडीचा वैद्यकिय उपचार मिळण्यासाठी संबंधित रुग्णालयाच्या प्रशासनाला सूचना केल्या. तसेच, कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या पार्श्वभूमिवर पोलिस अधिक्षकांनाही सूचना देण्यात आल्या असून पुढील कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य  विचारात घेत आमदार रोहित पवार यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत जखमी रविराज यांच्या प्रकृतीची चौकशी केली. हा प्रकार गंभीर असून बारामतीत हे कदापी खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. 

 
तावरे यांच्या समर्थकांवरही यापूर्वी झाले हल्ले 

माळेगाव हद्दीत राजकियदृष्ट्या रविराज तावरे यांचे कार्य सुरू असताना काही पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांचे टोकाचे वाद होते. रविराज यांचे खंद्दे समर्थक नितीन तावरे, रियाज शेख यांच्यावरही रात्रीच्या वेळी गावातील काही लोकांनी हल्ला केल्याची पोलिस ठाण्यात नोंद आहे. या परिस्थितीचा विचार करता हा प्रकार कायदा सुव्यस्थेला बाधा आणणारा आहे, संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com