हे कसले राजे, असे विचारत नारायण राणेंची संभाजीराजेंवर सडकून टीका

राणे पितापुत्रांचेसमान धोरण
Narayan Rane-Sambhajiraje
Narayan Rane-Sambhajiraje

पुणे : खासदार छत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambhajiraje) हे मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) निमित्ताने सध्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यांच्या मनात काय आहे, हे अनेकांना अद्याप उमजलेले नाही. मात्र या भेटीगाठींवरून राणे कुटुंबीय त्यांच्यावर टीका करत असते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी हे धोरण टीका कायम ठेवत ‘हे कसले राजे आहेत, असा सवाल पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला.

``रयतेने त्यांच्याकडे जायचे तर, हेच रयतेकडे जातात. त्यांच्या मागे किंवा आजूबाजूला कोणी नसते. समाजालाही ते राजे वाटत नाहीत. भाजपने स्वतःहून त्यांना खासदारकी दिली. परंतु, आता तिची मुदत संपत आल्यामुळे त्यांच्या आता ते अशा भेटीगाठी करीत आहेत,’’ असे राणे म्हणाले. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे हे शिवराज्यभिषेकदिनी रायगडावर आंदोलन करणार आहेत, असे त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर राणे म्हणाले, ‘‘रायगडावर आंदोलन करून काय उपयोग, तेथे कोण आहे. त्यांची दखल समाजही घेत नाही म्हणून रायगडावर जाण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे.’’

संभाजीराजेंच्या डोक्यात वेगळेच चालले आहे, अशा प्रकारची टीका माजी खासदार निलेश राणे यांनीही केली होती. आमदार नितेश यांनीही संभाजीराजेंच्या सध्याच्या धोरणावर नाराजी व्यक्त करत टोले लगावले होते. नारायण राणे यांनीही त्याचीच पुनरावृत्ती पुण्यात केली. नारायण राणे यांनी शिवसेनेवरही सडकून टीका केली.

ते म्हणाले, ``‘शिवसेनेत मी ३९ वर्षे होतो. त्यामुळे आरक्षणाबाबत त्यांची भूमिका काय आहे, हे मला जास्त माहिती आहे. शिवसेनेने कधीही आरक्षणाला पाठिंबा दिला नव्हता. त्यामुळेच मराठा समाजालाही त्यांना आरक्षण द्यायचे नव्हते. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाबाबत निष्काळजीपणा दाखविला आणि महापापाचे धनी झाले. मुळात ठाकरे यांचा आरक्षणाचा अभ्यास नाही. चार चांगले वकील त्यांना नियुक्त करता आले नाही. मातुश्रीःच्या बाहेर न पडणाऱ्या व्यक्तीला काय कळणार ? त्यामुळे मराठा समाजाने लक्षात घ्यायला पाहिजे की, त्यांना आरक्षण न मिळण्यास उद्धव ठाकरे जबाबदार आहेत.’’

राणे म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यामुळे आता केंद्र सरकारने काही तरी करावे, अशी मागणी महाविकास आघाडी सरकार करीत आहे. परंतु, राज्यघटनेतील कलम १५. ४ आणि १६. ४ चा अभ्यास केला तर सामाजिक आणि शैक्षणिक मागास, हे घटक लक्षात देऊन राज्य सरकार आरक्षण देऊ शकते. तमिळनाडूसह अन्य राज्यांनीही याच कलमांद्वारे आरक्षण दिले आहे.’’ ज्या मुद्द्यांच्या आधारे देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले होते, तेच मुद्दे राज्य सरकारच्या वकिलांना सर्वोच्च न्यायालयात मांडता आले नाहीत. आरक्षण मिळावे म्हणून भाजपने पाच तज्ज्ञ वकिल नियुक्त केले असून राज्य सरकारला हवे असेल तर ते नक्कीच मदत करतील, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेने लस विकत घेण्यासाठी जागतिक टेंडर काढले. एजन्सी फायनल झाली. पण, त्यांना १२ टक्के कमिशन महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला पाहिजे होते. परंतु, त्या कंपनीने कमिशन देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना टेंडर मिळाले नाही. परिणामी मुंबईकरांना लसही मिळाली नाही. मग केंद्र सरकारला दोष देण्यात काय अर्थ. मिळालेले राज्य चालवित येत नाही अन दुसऱ्यांना नावे ठेवतात, असेही राणे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com