हर्षवर्धन पाटलांचे स्वप्न अधुरेच; राज्यमंत्री भरणेंचे भरणेवाडीत निर्विवाद वर्चस्व 

भरणे यांच्या गटाच्या उमेदवारांच्या पारड्यामध्ये झुकते माप टाकले.
Minister of State Dattatreya Bharne's undisputed dominance over Bharnewadi Gram Panchayat
Minister of State Dattatreya Bharne's undisputed dominance over Bharnewadi Gram Panchayat

वालचंदनगर (जि. पुणे) : इंदापूर तालुक्‍यातील भरणेवाडी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत बिरोबा विकास पॅनेलने माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपपुरस्कृत परिवर्तन पॅनेलचा धुव्वा उडवत निर्विवाद वर्चस्व राखले. पाटील यांच्या गटाचा एकही उमेदवार निवडून न आल्याने पाटील यांचे भरणेवाडीत खाते उघडण्याचे स्वप्न हे अधुरेच राहिले. 

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे भरणेवाडी गाव आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या येथील गटाच्या भूमिकेमुळे येथील ग्रामपंचायत बिनविरोध होऊ शकली नव्हती. हर्षवर्धन पाटील यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती. त्यांच्या गटाचा पूर्ण पॅनेलही झाला नव्हता. तसेच, एकच उमेदवार दोन जागेवर उभा केला होता. निवडणुकीत मतदारांनी मात्र राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या गटाच्या उमेदवारांच्या पारड्यामध्ये झुकते माप टाकले असून सर्वच उमेदवार विजयी झाले आहेत. 

राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलचे विजयी उमेदवार 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत श्री बिरोबा ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार ः प्रभाग क्र.1- आबासाहेब भगवान भरणे, छाया दत्तू पोरे. प्रभाग 2 - अरविंद पोपट पोरे, स्वाती दीपक भरणे, प्रभाग 3- तानाजी मल्हारी खराडे, प्रभाग 4- दत्तात्रेय महादेव धापटे, प्रतिभा संतोष धापटे, सचिन उत्तम देवकुळे. 

प्रभाग क्र. 1 मधून मुमताज दिलावर मुलाणी व प्रभाग क्र. 3 मधून विजया अंबादास म्हस्के या दोन महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या होत्या. 

दोन जावांमधील अपक्ष उमेदवार विजयी 

प्रभाग क्र.1 मध्ये एकाच कुटुंबातील निर्मला प्रमोद भरणे व पुनम विजय भरणे या दोघी सख्या चुलत जावा एकमेकींच्या विरोधात उभ्या होत्या. यामध्ये राष्ट्रवादीपुरस्कृत निर्मला भरणे यांचा अपक्ष उमेदवार पूनम भरणे यांनी पराभव केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com