अमिताभ गुप्ता यांनी स्वीकारली पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची सूत्रे - IPS Amitabh Gupta Took Charge of Commissioner of Police Pune | Politics Marathi News - Sarkarnama

अमिताभ गुप्ता यांनी स्वीकारली पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची सूत्रे

सरकारनामा ब्युरो
रविवार, 20 सप्टेंबर 2020

राज्य सरकारने अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या सहा अधिकाऱ्यांच्या आणि अधीक्षक दर्जाच्या २२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गेल्या गुरुवारी रात्री उशिरा जाहीर केले. त्यात पुण्याच्या आयुक्तपदी अमिताभ गुप्ता यांचे नेमणूक करण्यात आली. लाॅकडाऊन काळात वाधवान बंधूंना देण्यात आलेल्या प्रवासाच्या पासमुळे त्यावेळी गृहखात्याच्या अतिरिक्त मुख्य सचीवपदाची जबाबदारी पाहणारे गुप्ता चर्चेत आले होते

पुणे : पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून आयपीएस अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी आज सकाळी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. मावळते पोलिस आयुक्त के. वेंकटेशम् यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. 

राज्य सरकारने अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या सहा अधिकाऱ्यांच्या आणि अधीक्षक दर्जाच्या २२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गेल्या गुरुवारी रात्री उशिरा जाहीर केले. त्यात पुण्याच्या आयुक्तपदी अमिताभ गुप्ता यांचे नेमणूक करण्यात आली. लाॅकडाऊन काळात वाधवान बंधूंना देण्यात आलेल्या प्रवासाच्या पासमुळे त्यावेळी गृहखात्याच्या अतिरिक्त मुख्य सचीवपदाची जबाबदारी पाहणारे गुप्ता चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. 

कटेशम यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आले. तसेच एल्गार परिषदेच्या माध्यमातून शहरी नक्षलवादाचा मुद्दाही त्या मुळे चर्चेत आला होता, त्याचा तपास त्यांनी यशस्वीपणे केल्याचा दाखला न्यायालयाने दिला आहे. नक्षलवाद विरोधी मोहिमेत विशेष अभियानात त्यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक पदावर राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. गुप्ता यांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आग्रही होते, असे समजते.

दरम्यान, ''आयपीएस अधिकारी गुप्ता यांनी मोठी चूक केली होती, त्यांना शिक्षाही झाली, त्यांचे समर्थन करणार नाही. पण त्यांना काही तरी जबाबदारी द्यायची म्हणून पुण्यात आणले, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. गुप्ता यांची पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली असून त्यांनी आजच सकाळी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. इतक्या वर्षांचे रेकॉर्ड बघितले तर तो चांगला आहे. अधिकारी बदल्या हा रुटीनचा भाग आहे. पोलिस आयुक्त नागपुर मार्गे येवो किंवा मुंबई शेवटी मार्ग महाराष्ट्रातूनच जाणार आहे," असे प्रतिपादन राज्याते गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पुण्यात बोलताना केले. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख