डॉक्‍टर होण्याचे स्वप्न होते; पण बनलो आयपीएस! 

शेतकरी कुटुंबात राहून एका उच्च ध्येयाने प्रेरित होऊन कासेगाव (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील अभयसिंह बाळासाहेब देशमुख यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले आहे. यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होणारे पंढरपूर तालुक्‍यातील पहिली व्यक्तीचा होण्याचा मानही देशमुख यांनी मिळविला आहे.
Had a dream of becoming a doctor; But became an IPS
Had a dream of becoming a doctor; But became an IPS

पंढरपूर : शेतकरी कुटुंबात राहून एका उच्च ध्येयाने प्रेरित होऊन कासेगाव (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील अभयसिंह बाळासाहेब देशमुख यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले आहे. यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होणारे पंढरपूर तालुक्‍यातील पहिली व्यक्तीचा होण्याचा मानही देशमुख यांनी मिळविला आहे.

लहानपणापासूनच डॉक्‍टर बनायचे स्वप्न होते, पण आयपीएस परीक्षेत 151 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. लोकांची सेवा करण्याबरोबरच पीडितांना न्याय देण्याचे प्रामाणिक प्रयत्न या पदाच्या माध्यमातून मी करणार आहे, असे अभियसिंह देशमुख यांनी मंगळवारी (ता. 4 ऑगस्ट) "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. त्यामध्ये अभियसिंह देशमुख हे उत्तीर्ण झाले आहेत. अभयसिंह हे लहानपणापासून हुशार होते. त्यांचे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. इयत्ता 11 वी, 12 वी येथील के. बी. पी. कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर पुणे येथील कॉलेज आफ इंजिनिअरिंगमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. इंजिनिअर झाल्यानंतर कुठेही मोठ्या पगाराची नोकरी मिळाली असती. पण, नोकरीच्या पाठीमागे न लागता पुणे येथे राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. 

गेल्या तीन वर्षापासून ते यूपीएससीचा अभ्यात करत होते. गेल्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाले होते. रॅंकमध्ये 503 क्रमांक मिळाला होता. इंडियन कॉर्पोरेटमध्ये निवडदेखील झाली होती. परंतु आयपीएस होण्याचे स्वप्न मला स्वस्थ बसू देत नव्हते. त्यानंतरही पुन्हा लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. त्यामध्ये आयपीएसचे स्वप्न सत्यात उतरले. या परीक्षेत 151 व्या क्रमांकाने ते उतीर्ण झाले आहेत. 

वडील बाळासाहेब देशमुख हे कासेगाव येथे शेती करतात. डाळींब आणि द्राक्ष शेतकरी म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे. शेतकरी कुटुंबात राहूनही अभयसिंह यांनी आयपीएस पदाला गवसणी घातली आहे. त्यांचे हे यश ग्रामीण भागातील अनेक तरुणांना आपल्या ध्येयापर्यंत पोचविण्यासाठी नक्कीच प्रेरणा देणारे आहे. 


अभयसिंहच्या कष्टाचे फळ 

अभयसिंह गेल्या तीन वर्षांपासून आयपीएससाठी प्रयत्न करत होता. आज शेवटी त्याच्या या कष्टाला यश आले. त्याची जिद्द, मेहनत आणि कष्ट करायची तयारी पाहून आम्हीदेखील थक्क व्हायचो. आम्ही शेतकरी असल्यामुळे तो सुटीला आला की गावात येऊन शेतीबद्दल विचारायचा. त्याचे शेतीवरचे प्रेम पाहून आम्हालाही त्याचा अभिमान वाटतो. आयपीएस होऊन त्याने आमचे, गावाचे आणि तालुक्‍याचे नाव मोठे केले आहे, असे अभयसिंहचे वडील बाळासाहेब देशमुख यांनी सांगितले. 

शाळेत प्रथमपासूनच हुशार होतो. पुढे उच्चशिक्षण घेऊन डॉक्‍टर बनण्याचे स्वप्न होते. परंतु डॉक्‍टर होता आले नाही. मग पुढे काय? असा विचार आला. तरीही न डगमगता, हार न मानता, प्रशासकीय सेवेत जाऊन लोकांची सेवा करण्याचे ठरविले. त्यातूनच मग यूपीएससीचा अभ्यास सुरु केला. सलग तीन वर्षे अत्यंत मेहनत आणि कष्ट घेऊन अभ्यास केला. दुसऱ्याच प्रयत्नांत यश मिळाले. परंतु मला ते यश अपेक्षित नव्हते. त्यानंतर पुन्हा जोमाने प्रयत्न केले. माझ्या प्रयत्नाला, तसेच आई आणि वडिलांच्या कष्टाला आज यश मिळाले. डॉक्‍टर होता आले नसले तरी आयपीएस झाल्याचे मोठे समाधान आहे. 

-अभयसिंह देशमुख, 
आयपीएस परीक्षा उत्तीर्ण 


Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com