दोनवेळा हारलेल्या नातवाला विजयी करुन आजीबाई देवाघरी गेल्या - Grandmother went to dath after defeating her grandson who had lost two times | Politics Marathi News - Sarkarnama

दोनवेळा हारलेल्या नातवाला विजयी करुन आजीबाई देवाघरी गेल्या

गोरख माझिरे
सोमवार, 18 जानेवारी 2021

विजयी उमेदवार विजय साठे यांच्या आजी सरुबाई शंकर साठे या ११३ वर्षाच्या होत्या. आपल्या नातवाला मतदान रुपी आशिर्वाद देऊन मतदानाच्या दिवशीच रात्री शेवटचा श्वास घेतला.

कोळवण : वाळेण (ता. मुळशी) येथील वार्ड १ मध्ये विजय मुगुट साठे यांचा एक मताने विजय झाला. त्यांना १२७ तर विरोधी उमेदवार संजय चिंधु साठे यांना १२६ तर यशवंत किसन ढमाले यांना १३ मते पडली. 

विजयी उमेदवार विजय साठे यांच्या आजी सरुबाई शंकर साठे या ११३ वर्षाच्या होत्या. आपल्या नातवाला मतदान रुपी आशिर्वाद देऊन मतदानाच्या दिवशीच रात्री शेवटचा श्वास घेतला. त्यामुळे आजीचे मत त्यांच्या विजयासाठी निर्णायक ठरले. त्यामुळे विजय मुगुट साठे यांच्या एका डोळ्यात आसू तर एका डोळ्यात हसू होते. 

आजींचे वय जास्त असल्याने त्या गेल्या १५ दिवसांपासुन खुपच थकल्या होत्या. पंधरा दिवसांत कधी शेवटचा श्वास घेतील याची शाश्वती नव्हती. परंतु निवडणुकीत मतदान केल्यावर त्याच दिवशी रात्री दहाच्या दरम्यान त्या मयत झाल्या. यातुन त्यांचा जिव हा मतदानातच अडकला होता अशी चर्चा पंचक्रोषित होत आहे. 

2005 मध्ये विजय साठे हे २७ मतांनी विजय घोषित केले होते, परंतु  फॉर्म चुकल्याने त्यांना पराभव स्विकारावा लागला. 2010 मध्ये साठे यांचा 1 मताने पराभव झाला. 2015 साली स्वत: विजय साठे यांनी ग्रामपंचायत बिनविरोध केली. सन २०२१ मध्ये त्यांनी गाव बिनविरोध करण्याचे ठरवले परंतु त्यांना गावाचाच विरोध झाला. 
 
मी निवडुन येण्यामध्ये आजीच्या एका मताचे महत्त्व आहे. आज हा आनंदोत्सव पहाण्यासाठी माझी आजी हवी होती, माझ्या आनंदात आणखी भर पडली असती. अशी प्रतिक्रिया विजय साठे यांनी दिली आहे. 

वालचंदनगर,कळंबमध्ये बंडाळीने राष्ट्रवादीचा घात : दोन्ही ग्रामपंचायती भाजपकडे 
 
वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर व कळंब ग्रामपंचायतीवर भाजपपुस्कृत पॅनेलने मुसंडी मारली आहे. या ग्रामपंचायतीवर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटलांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस मधील बंडाळी रोखण्यास अपयश आल्याने राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे. 

वालचंदनगर ग्रामपंचायतीवर गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सध्याच्या भाजपची व त्यावेळीच्या काँग्रेसची एक हाती सत्ता होती. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामध्ये गटबाजी झाली. याचा फटका राष्ट्रवादीला बसला.

भाजपुरस्कृत पॅनेलचे ११ उमेदवार विजयी झाले असून यामध्ये दोन उमेदवार बिनविरोध निवडूण आले आहे. यामध्ये अर्बन बॅंकेचे संचालक सत्यशिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य कुमार गायकवाड यांनी महत्वाची भूमिका बजावली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच उमेदवार विजयी झाले, असून बसपाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. 

सेनेचे आमदार आबिटकरांनी असे, काय केले की तीनही पक्ष पराभूत झाले 
 
कोल्हापूर : भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर (ता. भुरदगड, जि. कोल्हापूर) ग्रामपंचायतींवर शिवसेनेने आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वात आपला झेंडा फडकवला आहे. शिवसेनेच्या पॅनेलाला विरोध करण्यासाठी भाजप, कॉंग्रेस व राष्ट्रवादीने केलेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने धुरळा उडाला होता. गट-तट व सहकार समूहाच्यामाध्यमातून निवडणूका लढवल्या गेल्या. दरम्यान, काही ग्रामपंचायती पक्षीय पातळीवर लढल्या गेल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जावून शिवसेनेला टक्कर देण्याचा निर्णय घेतला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख