शिवसेनेसोबतच्या युतीत आमचा श्वास कोंडत होता : देवेंद्र फडणवीस

युती असल्याने तेव्हा पक्षवाढीसाठी काही मर्यादा होत्या.
Former Chief Minister Devendra Fadnavis criticizes Shiv Sena
Former Chief Minister Devendra Fadnavis criticizes Shiv Sena

मुंबई : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे सरकार आल्याने भारतीय जनत पक्षाला संधी आहे. जसा तुमचा श्वास कोंडत होता, तसाच आमचाही युतीत असताना काही ठिकाणी श्वास कोंडत होता. आता राज्यात तीन पक्ष एकत्र आलेत, आता श्वास त्यांचा कोंडतोय. युती असल्याने तेव्हा पक्षवाढीसाठी काही मर्यादा होत्या. पण, आता मोकळा श्वास घेतोय. आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष स्वबळावर सत्तेत येईल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. (Former Chief Minister Devendra Fadnavis criticizes Shiv Sena)

पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा बुचके यांचा आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. आशा बुचके आधी शिवसेनेत होत्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसेचे आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे पक्षाने त्यांनाच उमेदवारी दिली. त्या प्रकरामुळे चिडलेल्या बुचके यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केली होती. शिवसेनेने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधानसभेच्या तीन निवडणुका आशा बुचके लढल्या. पण, दुर्दैवाने तीनही वेळी घात झाल्याने त्या निवडून येऊ शकल्या नाहीत. मात्र, आता आम्हाला १०० टक्के विश्वास आहे की २०२४ मध्ये जुन्नरचा आमदार भारतीय जनता पक्षाचा असेल आणि त्या आशाताई बुचके असतील, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सुनील कर्जतकर, हाजी आरफत शेख यांच्यासह बुचके यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवेशाच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, गेली अनेक दिवस आम्ही आशा बुचके यांच्या या प्रवेशाची प्रतिक्षा करत होतो. महिला असूनही मुंबईत प्रस्थापित असतानाही बुचके या आपल्या मूळ गावी म्हणजे जुन्नर तालुक्यात गेल्या. तिथे ४ वेळा वेगवेगळ्या मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या निवडून आल्या आहेत. आशा बुचके यांना शिवसेनेत न्याय मिळाला नाही. भारतीय जनता पक्षात त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय तसेच सन्मानही दिला जाईल. जुन्नरमधून तीनदा आमदारकीची निवडणूक लढवली. पण, त्यात त्या यशस्वी झाल्या नाहीत. मात्र, येणाऱ्या निवडणुकीत त्यांना आमदार झालेले बघायचं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com