`फुकट बिर्याणी`ला हफ्तावसुलीचा तडका : IPS नारनवरे यांचा आधीच्या उपायुक्तांवर निशाणा - Deputy Commissioner of Police Priyanka Naranware explanation on Biryani viral clip | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

`फुकट बिर्याणी`ला हफ्तावसुलीचा तडका : IPS नारनवरे यांचा आधीच्या उपायुक्तांवर निशाणा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 30 जुलै 2021

मी इथे आल्यामुळे अनेकांचे हितसंबध दुखावले गेले आहेत. हप्ता वसुलीचे त्यांचे रॅकेट आहे, असा गैाप्यस्फोट नारनवरे यांनी केला आहे.  

पुणे : ''पोलिस आयुक्तालयातील कर्मचारीच आपल्यालाच त्रास देतात,'' असा आरोप पुणे पोलिस परिमंडळ एकच्या उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी केला आहे. पोलिस कर्मचारी महेश साळुंखे, आणि  ज्ञानेश्वर पालवे यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. मी शिस्तप्रिय अधिकारी असून मी इथे आल्यामुळे अनेकांचे हितसंबध दुखावले गेले आहेत. हप्ता वसुलीचे त्यांचे रॅकेट आहे, असा गैाप्यस्फोट नारनवरे यांनी केला आहे.  

प्रियंका नारनवरे म्हणाल्या की, ही मॉर्फ ऑडिओ क्लिप आहे. यातील संदर्भ जुना आहे. माझ्या कार्यालयात जे पोलिस अधिकारी, कर्मचारी दहा-दहा वर्ष झाले ते हप्ता वसुल करायचे. त्यांची बदली करण्यात आली तरीही ते तेथून हप्ते वसूल करीत आहेत. मी आल्यापासून येथील कर्मचाऱ्याचे हितसंबध दुखावले गेले आहेत. दुसरे पण काही अधिकारी आहेत त्याचेही हित दुखावले गेले आहेत. नवीन उद्योग सुरु करण्याचे काम सांळुखे करीत होते. त्यांचे मोठे रॅकेट आहे. त्याच्याबाबत पोलिस आयुक्ताकडे मी लेखी तक्रार दिली आहे. पण अजून पोलिस आयुक्तांनी कारवाई केलेली नाही करवाई करतो, असे ते म्हणाले आहेत.  

''नाहीतर रेल भरो आंदोलन करावे लागेल'' मनसेचा सरकारला इशारा

''मी उपायुक्त म्हणून परिमंडळ एक येथे येण्यापूर्वी यांचे सर्व गैरव्यवहार सुरु होते. त्यांचे रॅकेट सेट होते. अजूनही इथून काही लोकांना हप्ते जातात. काही दिवसांपूर्वी खंडणीचे कासट प्रकरण झाले होते त्यातही त्यांचा संबध होता. मी आल्यानंतर त्यांचे गैरप्रकार बंद केले. मी शिस्तप्रिय अधिकारी आहे. यापूर्वी ठाणे, जालना आदी ठिकाणी चांगले काम केलं आहे. इथे आल्यानंतर संबंधितांचे हितसंबध दुखावले गेले. मी इथे आल्यानतर आधीच्या डिसीपींना पोलिस मुख्यालयात जावे लागले. मी थेट आयपीएस असल्यामुळे माझ्याबाबत येथील काहींना हेवा वाटतो. बदल्या होणार असल्याच्या निर्णयाच्या वेळी ही क्लिप बाहेर आणली आहे. महेश साळुंखे हे सध्या गुन्हे शाखेत आहेत. तर पालवे हे फरासखाना पोलिस ठाण्यात आहेत. या क्लिपच्या घटनेला आता दहा महिने झाले असतील. त्यांनी वेळोवेळी आपण जे बोलतो त्यात बदल करुन ही क्लिप तयार केली आहे. ही क्लिप माॅर्फ आहे. त्यासंबंधात मी सायबर शाखेकडे तक्रार नोंदविली,'' असे प्रियंका नारनवरे म्हणाले. मी येण्यापूर्वी इथे अधिकाऱ्यांचे रॅकेट सेट होते. अजूनही त्यांना हप्ते जातात, त्यांच्या या प्रकारात मी आल्यानंतर खंड पडला. या क्लिपच्या माध्यमातून त्यांनी ही संधी साधली, असे नारनवरे म्हणाल्या. 

शिवसेना शाखाप्रमुखाकडून डिलिव्हरी बॉयला मारहाण 
नारनवरे यांची यांनी आपल्या कर्मचाऱ्याशी केलेले फोनवरील संभाषण सध्या खूप व्हायरल होत आहे.  याबाबत कर्मचाऱ्याने त्यांची तक्रार थेट पोलिस महासंचालकाकडे केली आहे. त्या कर्मचाऱ्याने याबाबतचे पत्र आणि आँडिओ क्लिप audio clipपोलिस महासंचालकांना पाठविली आहे.   

हेही वाचा : पोलिस उपायुक्त मॅडमला हवी आहे, चिकण बिर्याणी तीही मोफत 

पुणे : लाचखोर अन् कामचुकार अधिकाऱ्यांबाबत आपण नेहमीच ऐकतो, पण एका महिला पोलिस Pune Police अधिकाऱ्याला पुण्यातील प्रसिद्ध हाँटेलची बिर्याणी Biryani मोफत हवी आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख