चंद्रकांतदादांच्या विरोधातली याचिका न्यायालयाने फेटाळली

कोथरूड विधानसभा निवडणुकीत चंद्रकांतपाटील यांनी खोटे शपथपत्र दाखल केले असा आरोप करत श्री. अभिषेक हरिदास यांनी भारतीय लोकप्रतिनिधी कायदा1951च्या कलम125(अ) अन्वये पाटील यांच्यानिवडीविरुद्ध न्यायालयात दाद मागितली होती.
Chandrakaant Patil
Chandrakaant Patil

पुणे : कोथरूड विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी खोटे शपथपत्र दाखल केले असा आरोप करत श्री. अभिषेक हरिदास यांनी भारतीय लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 125 (अ) अन्वये पाटील यांच्या निवडीविरुद्ध न्यायालयात दाद मागितली होती. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 202 अंतर्गत पुण्यातील फौजदारी न्यायालयात (JMFC) याबाबतचा खटला दाखल करण्यात आला होता.  न्यायाधीश जान्हवी केळकर यांनी पाटील यांच्या विरोधातले सर्व आरोप फेटाळून लावले व सदर खटला निकाली काढल्याचे भाजपने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता ते महसूल मंत्री आणि नंतर पक्षाचा प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत मारलेली मजल ही काही हितशत्रूंना मानवत नाही आणि त्यामुळेच मला अडचणीत आणण्यासाठी खोटे शपथपत्र दाखल केल्याची तक्रार करून मला त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र सत्याचाच विजय होतो हे न्यायालयाच्या निकालाने दाखवून दिले आहे असल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली आहे.

प्रसिध्दीपत्रकात श्री. पाटील यांनी म्हटले आहे की, अशा खोट्या आरोपांची आता सवय झाली आहे. या आरोपांमुळे मानसिक त्रास होतो हे जरी खरे असले तरी अशा कट-कारस्थानातून मी अधिक तावून सुलाखून बाहेर पडून पुन्हा एकदा समाजसेवेचे जे व्रत स्वीकारले आहे ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा सज्ज होतो.

तक्रारदाराच्या सर्व तक्रारींची व सोबतच्या साक्षी पुराव्यांची शहानिशा करुन मा. न्यायालयाने निरीक्षण नोंदविताना  पाटील यांच्या विरुद्धचे सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. यात प्रामुख्याने...

1) पाटील यांनी शपथपत्रात जोडलेली आयकर विवरणपत्र योग्य असल्याचे निरीक्षण नोंदविले.

2) तसेच निवडणूक लढवत असताना पाटील हे कोणत्याही लाभाच्या पदावर नसल्याने हा दावा ही फेटाळण्यात आला.

3) त्याचबरोबर चंद्रकांत पाटील ज्या पदांवर पदसिद्ध होते त्या पदावरील व्यक्तीस मानधन मिळत नसल्याने शपथपत्रात उत्पन्न लपविले असे म्हणणे देखील अयोग्य असल्याचे निरीक्षण ही न्यायाधीशांनी नोंदवले.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com