बोया पेड बबूल का, आम कहाँसे खाय? - सचीन सावंतांनी साधला भाजप वर निशाणा

"अर्णब गोस्वामीला पाठिंबा आणि ट्रोलिंगविरोधात बदनामी केल्याबद्दल तक्रार- भाजपा, किती विरोधाभास आहे, नाही का?"असा खोचक प्रश्न काँग्रेस प्रवक्ते सचीनसावंत यांनी भाजपच्या नेत्यांना उद्देशून विचारला आहे.
Sachin Sawant Targets BJP over Trolling
Sachin Sawant Targets BJP over Trolling

पुणे : ''बाभळीच्या झाडाला आंबे कसे येणार?बाभळीची झाड लावून आंबे खायला मिळणार नाहीत."असं म्हणत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी 'ट्रोलिंग' विरोधात तक्रार करणाऱ्या भाजप नेत्यांची खिल्ली उडवली आहे. 'ट्रोल'चे जनक आता ट्रोलिंग विरोधात तक्रार करत आहेत असं सावंत यांनी म्हटलं आहे.

सावंत यांनी एक ट्विट करून भाजप नेत्यांवर टिका केली आहे. ''ट्रोल्सच्या 'जनकांना' आज ट्रोल् विरोधात तक्रार करण्याची वेळ येणे हा नियतीचा खेळ आहे. बोया पेड बबूल का, आम कहाँसे खाय? २०१४ नंतर देशात ट्रोलधाड भाजपाने आणली. आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. अजून धर्मांधता भाजपा ट्रोल्स पसरवतात.तरीही शिवीगाळ,धमक्या असतील तर पोलिसांनी कारवाई करावी." असे सावंत यांनी म्हटले आहे.

"अर्णब गोस्वामीला पाठिंबा आणि ट्रोलिंगविरोधात बदनामी केल्याबद्दल तक्रार- भाजपा, किती विरोधाभास आहे, नाही का?"असा खोचक प्रश्नही सावंत यांनी विचारला आहे. 'बाभळीची झाड लावली तर आंबे खायला मिळणार नाहीत."अशी टिपणी करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजपच्या नेत्यांनी ट्रोल करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्टर प्रसिद्ध केलेल्या व्यक्तीला राज्यपालांकडे भेटायला कोण घेऊन गेले? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. ''ट्रोलर्स निर्माण करणाऱ्या जनकांना आता ट्रोलर्सवर कारवाई करा म्हणण्याची वेळ यावी हा नियतीचा खेळ आहे."असे सावंत यांनी म्हटले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com