मुख्यमंत्र्यांचा संभाजीराजेंसाठी ट्रॅप; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप  - CM Uddhav Thackerays trap for SambhajiRaje says Prakash Ambedkar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

मुख्यमंत्र्यांचा संभाजीराजेंसाठी ट्रॅप; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 17 जून 2021

संभाजीराजे यांच्यासह राज्यभरातील समन्वयक सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

पुणे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. संभाजीराजे यांनी बुधवारी कोल्हापूरात मुक आंदोलन करून राज्य सरकारला इशारा दिला आहे. यापार्श्वभूमीवर आंदोलन टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना भेटीचे निमंत्रण दिले. पण ही भेट म्हणजे संभाजीराजेंसाठी ट्रॅप असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. (CM Uddhav Thackerays trap for SambhajiRaje says Prakash Ambedkar)

संभाजीराजे यांच्यासह राज्यभरातील समन्वयक सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांनीच भेटीचे निमंत्रण दिल्याने मराठा समाजासाठी संभाजीराजेंनी केलेल्या मागण्या मान्य करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची चर्चा आहे. मराठा समाजाचे आंदोलन चिघळू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यादृष्टीने आजची बैठक महत्वाची मानली जात आहे. 

या भेटीविषयी माध्यमांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, मला यात राजकारण दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना बोलावणे हा ट्रॅप वाटतो. राणे समिती, गायकवाड कमिशन या दोन्हीमध्ये जाणीवपूर्वक सुप्रीम कोर्टाला चॅलेंज देण्याचा भाग होता. भाजपने ही जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाला साईड ट्रक केले. संभाजीराजेंच्या नावावर मराठा आरक्षणाचे खापर फोडण्याचा प्रयत्न होतोय, असा गंभीर आरोप आंबेडकर यांनी केला आहे. 

हेही वाचा : वाहनचालकांना मोठा दिलासा; कागदपत्रांची मुदत संपली तरी काळजी करू नका!

संभाजीराजेंनी पक्ष काढावा

प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी कोल्हापुरात मुक आंदोलनात सहभागी होत त्यावर शिक्कामोर्तब केले. तसेच संभाजीराजे व आंबेडकरांची पुण्यात भेट झाल्यानंतर त्यांनी राजकारणात दोघे एकत्र येण्याचे संकेतही दिले होते. याअनुषंगाने आंबेडकरांनी संभाजीराजेंनी पक्ष काढत सत्तेत येण्याचे आवाहन केले. मराठा आरक्षणाला पाठींबा दिला असला तरीही हा सत्तेशी निगडित प्रश्न आहे. सत्ता असेल तरच मराठा आरक्षण मिळेल, असे आंबेडकर म्हणाले. 

उत्तर प्रदेशात दंगल भडकवण्याचा प्रयत्न

मागील आठवड्यात उत्तर प्रदेशमध्ये एका मौलवीची दाढी काढण्यात आली. उत्तर प्रदेश मधील मुज्जफरपुर येथे दंगल भडकवण्याचा प्रयत्न झाला. पण लोकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. कुराण, देव, इतर साधू-संतांची विटंबना करणं, त्यांच्याविषयी अपशब्द काढणं, अशाप्रकारचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल ज्यांच्या बाजूने जाईल त्यांच्या बाजूने 2024 चा निकाल जाईल, असे भाकित आंबेडकर यांनी वतर्वलं.

शांततेसाठी कायदा हवा

विटंबणा झाली की आता लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया येतील. त्यामुळं पुढच्या काळात शांतता टिकून राहिली पाहिजे. त्यासाठी कायदा होणं गरजेचं आहे. त्याच प्रारूप वंचित बहुजन आघाडीने तयार केलं आहे. विधानसभेत वंचितचा एकही आमदार नसला तरी येत्या अधिवेशनात हा कायदा मांडण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही आंबेडकर यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख