बारामतीच्या 'क्राईम ब्रँच'ची फेररचना होणार

बारामतीत आज पत्रकारांशी बोलताना नूतन अतिरिक्त पोलिस अधिक्षक मिलिंदमोहिते यांनी आगामी योजनांबद्दल माहिती दिली. पोलिस दल अधिक लोकाभिमुख करण्याचा आपला प्रयत्न असून कायदा व सुव्यवस्था राखतानाच अवैध व्यवसायांविरुद्ध आम्ही जोरदार कारवाई करू, असा इशाराही मिलिंद मोहिते यांनी दिला.
Baramati Crime Branch will be Restructured Say Milind Mohite
Baramati Crime Branch will be Restructured Say Milind Mohite

बारामती : बारामतीमध्ये कार्यरत असलेली गुन्हे शाखा अर्थात क्राईम ब्रँच नूतन अतिरिक्त पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी बरखास्त केली आहे. आता लवकरच या शाखेची फेररचना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  

बारामतीत आज पत्रकारांशी बोलताना मोहिते यांनी आगामी योजनांबद्दल माहिती दिली. पोलिस दल अधिक लोकाभिमुख करण्याचा आपला प्रयत्न असून कायदा व सुव्यवस्था राखतानाच अवैध व्यवसायांविरुद्ध आम्ही जोरदार कारवाई करू, असा इशाराही मिलिंद मोहिते यांनी दिला. 

बारामती क्राईम ब्रँचचे काम उत्तम सुरु होते. आता  स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे दुसरे युनिट बारामतीत सुरु करण्याची योजना आहे. त्या साठी नवीन अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जातील, अशी माहिती मोहिते यांनी दिली. तुलनेने बारामतीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कमी असले तरी वाहतुकीची समस्या शहरात मोठी आहे. त्याबाबत उपाययोजना करुन नागरिकांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मोहिते यांनी सांगितले. वाहतूक कोंडी व अन्य मुद्यांवर संबंधितांशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

नागरिकांमध्ये केवळ वाहतुकीबाबत जनजागृती करुन फारसा उपयोग होत नाही, असा अनुभव आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाई करावी लागते व ती प्रभावीही ठरते. त्यामुळे जनजागृती सुरु ठेऊन दंडात्मक कारवाईही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. विना हेल्मेट दुचाकी चालवणे, चार चाकी वाहन चालवताना सीट बेल्ट न लावणे या गुन्ह्यांसाठीही कारवाई करण्यामागे अपघातात कुणाचा जीव जाऊ नये, हीच आमची भावना असल्याचे मोहिते म्हणाले. आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पंधरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून नागरिकांनीही काही त्रुटी असतील तर त्या कळवाव्यात, असे आवाहन मोहिते यांनी केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com