भाजपचे मावळ तालुका माजी अध्यक्ष घोटकुले यांच्यावर प्राणघातक हल्ला - Attack on Pune District Maval BJP Leader | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

भाजपचे मावळ तालुका माजी अध्यक्ष घोटकुले यांच्यावर प्राणघातक हल्ला

सरकारनामा ब्युरो
रविवार, 5 जुलै 2020

 शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटकुले हे आपल्या घराजवळ रात्री ९.१५ च्या सुमारास शतपावली करत असताना पाच चारचाकी मधून आलेल्या ८-९ जणांच्या टोळक्यांनी त्यांना घेरले व डोक्याला रिव्हाल्वर लावून गळ्यातील चार तोळ्यांची चैन व तीन तोळ्यांचे ब्रास्लेट जबरदस्तीने काढून घेतले

बेबडओहोळ  : पुणे जिल्हा युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष व मावळ तालुका भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले अज्ञातांनी केलेल्या केलेल्या प्राणघातक हल्ल्यातून थोडक्यात बचावले. त्यांच्या राहत्या घरासमोर आढले बुद्रुक येथे शनिवार (ता. ४) रोजी सव्वानऊच्या सुमारास ही घटना  घडली. 

या संदर्भात बाळासाहेब घोटकुले यांनी शिरगाव पोलीस चौकी येथे रात्री उशिरा फिर्याद दाखल केली आहे. शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटकुले हे आपल्या घराजवळ रात्री ९.१५ च्या सुमारास शतपावली करत असताना पाच चारचाकी मधून आलेल्या ८-९ जणांच्या टोळक्यांनी त्यांना घेरले व डोक्याला रिव्हाल्वर लावून गळ्यातील चार तोळ्यांची चैन व तीन तोळ्यांचे ब्रास्लेट जबरदस्तीने काढून घेतले. 

वेळीच आरडाओरड केल्याने यावेळी मदतीसाठी आलेले बंधू भाऊसाहेब घोटकुले यांना झटापटीत ओठाला किरकोळ मार लागून ते जखमी झाले. यानंतर गाडीमध्ये बसून  हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यातील आरोपींचा शोध शिरगाव पोलीस करत असून हल्लेखोरांना लवकरच ताब्यात घेतले जाईल, असे पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी सांगितले. यासंदर्भात घोटकुले यांना विचारले असता हल्लेखोर आपल्याला मारण्याच्या उद्देशाने आले असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख