पुणे पदवीधरसाठी राष्ट्रवादीकडून अरुण लाड, श्रीमंत कोकाटे शर्यतीत  - Arun Lad, Shrimant Kokate interested for Pune Graduate Constituency from NCP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

पुणे पदवीधरसाठी राष्ट्रवादीकडून अरुण लाड, श्रीमंत कोकाटे शर्यतीत 

सुनील पाटील 
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादीकडून अरुण लाड व श्रीमंत कोकाटे शर्यतीत आहेत. गेल्या दीड दोन वर्षाहून अधिककाळ दोन्ही इच्छुकांकडून पदवीधरांच्या गाठीभेटी, समस्या जाणून घेणे, मतदार फॉर्म भरून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादीकडून अरुण लाड व श्रीमंत कोकाटे शर्यतीत आहेत. गेल्या दीड दोन वर्षाहून अधिककाळ दोन्ही इच्छुकांकडून पदवीधरांच्या गाठीभेटी, समस्या जाणून घेणे, मतदार फॉर्म भरून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार यावरच भाजपची रणणीत ठरणार आहे. त्यामुळे या दोन्ही प्रबळ दावेदांरापैकी आत कोणाचा नंबर लागणार हे आता येणाऱ्या काळात समजणार आहे. 

पुणे मतदार संघातमध्ये गेल्या (२०१४) निवडणुकीत आघाडीत झालेल्या बंडखोरीमुळे आणि मतविभागणीमुळे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना निसटता विजय मिळाला होता. अत्यंत चुरशीने आणि लक्षवेधी ठरलेल्या निवडणूकीत चंद्रकांत पाटील २ हजार ३८० मतांच्या फरकाने विजयी झाले होते. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून सारंग पाटील आणि अरुण लाड दोघांनीही आपला दावा सांगितला होता. यामध्ये सारंग पाटील यांना संधी मिळाली. त्यामुळे अरुण लाड यांनी बंडखोरी केली होती.

सारंग पाटील आणि अरुण लाड यांच्या मध्ये आघाडीची मते विभागल्यामुळे दोघांनाही पराभव पत्कारावा लागला. अरुण लाड यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नव्हते. शेवटी अरुण लाडही मैदानात उतरले होते. 

सध्या होवू घातलेल्या निवडणुकीत अरुण लाड  सुरुवातीपासून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणूनच पदवीधरांशी संर्पक साधत आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध माध्यमातून त्यांच्या भेटीही घेत आहेत. तर, श्रीमंत कोकाटे हे देखिल पदवीधरांसाठी विविध योजना व विषय घेवून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांनीही राष्ट्रवादीकडूनच निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे. दीड दोन वर्षापासून श्री कोकाटे यांनीही पायाला भिंगरी बांधून पदवीधर मतदारांपर्यंत गाठीभेटी सुरु ठेवल्या आहेत. 

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख