'शिवसेनेसाठी आमची दारे बंद' असे काहीही घडलेले नाही - अमित शहा - Amit Shah Clarifies Stand about Shivsena and Akali Dal | Politics Marathi News - Sarkarnama

'शिवसेनेसाठी आमची दारे बंद' असे काहीही घडलेले नाही - अमित शहा

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

अमित शहा यांनी एका मुलाखतीत शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलाबाबतही पक्षाची भूमिका स्पष्ट केली. एनडीएत ३० हून अधिक पक्ष आहेत. शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल हे स्वतःहून एनडीएतून बाहेर पडले आहेत. आम्ही त्यांना बाहेर काढलेले नाही असे ते म्हणाले

पुणे : शिवसेना व अकाली दल स्वतःहून एनडीएमधून बाहेर पडले आहेत. शिवसेनेसाठी आमची दारे बंद किंवा खुली असे काहीही घडलेले नाही. तसा कुठलाही मुद्दा नाही, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

या मुलाखतीत अमित शहा यांनी शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलाबाबतही पक्षाची भूमिका स्पष्ट केली. एनडीएत ३० हून अधिक पक्ष आहेत. शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल हे स्वतःहून एनडीएतून बाहेर पडले आहेत. आम्ही त्यांना बाहेर काढलेले नाही. दोन्ही पक्षांचा कृषी विधेयकांना विरोध आहे. शिवसेनेसाठी दार उघडं किंवा बंद असं काही मुद्दा नाही. तसं काही घडलेले नाही, असं अमित शहा यांनी स्पष्ट केले.

''पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी चुकीची नाही. कारण तेथील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत वाईट आहे. केरळमध्ये पूर्वी ज्या पद्धतीने राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या जात, तशाच आता पश्चिम बंगालमध्ये होताना दिसत आहेत,'' असेही अमित शहा एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. हाथरस प्रकरणात स्थानिक पोलिस स्टेशन स्तरावर चूक झाल्याचे त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या निदर्शनास आणून दिले. 

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरे सुरु करण्याबाबत पाठविलेल्या पत्रावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्यावर नाराज झाले असल्याचेही या मुलाखतीत दिसून आले. कोश्यारी यांनी लिहिलेले पत्र मी वाचले असून या पत्रातले काही शब्द त्यांना टाळता आले असते, असेही शहा या मुलाखतीत म्हणाले. 
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख