शशिकांत शिंदेंना आलेल्या 'आॅफर'ची त्यांच्याकडून माहिती घेऊ - अजित पवार - Ajit Pawar Comments about Offer to Shashikant Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

शशिकांत शिंदेंना आलेल्या 'आॅफर'ची त्यांच्याकडून माहिती घेऊ - अजित पवार

मिलिंद संगई
रविवार, 24 जानेवारी 2021

आमदार शशिकांत शिंदे यांनी आपल्याला मंत्रीपद व शंभर कोटींची ऑफर भाजपकडून आली होती, असे विधान काल केले त्या संदर्भात पवार यांना विचारले असता, त्यांनी शशिकांत शिंदे यांच्याशी प्रजासत्ताक दिनानंतर गेल्यानंतर बोलून मगच मत व्यक्त करु असे सांगितले. 

बारामती : आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांना आलेल्या ऑफर संदर्भात आपण मुंबईला गेल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करुन मगच या बाबत मत व्यक्त करु अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. बारामतीत आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रीया व्यक्त केली. 

आमदार शशिकांत शिंदे यांनी आपल्याला मंत्रीपद व शंभर कोटींची ऑफर भाजपकडून आली होती, असे विधान काल केले त्या संदर्भात पवार यांना विचारले असता, त्यांनी शशिकांत शिंदे यांच्याशी प्रजासत्ताक दिनानंतर गेल्यानंतर बोलून मगच मत व्यक्त करु असे सांगितले. 

पवार म्हणाले, उपमुख्यमंत्री या नात्याने आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मतदारसंघातील विकासकामांच्या संदर्भात भेटीला आले होते, त्यांच्या कामाबाबत मंत्रालयात बैठक लावतो असे मी त्यांना सांगितले आहे. मी विरोधात होतो तेव्हा माझ्या मतदारसंघातील कामे मी त्या वेळेसच्या राज्यकर्त्यांकडे घेऊन जात होतो, असे सांगत यात काहीही राजकारण नसल्याचेच पवार यांनी नमूद केले. 

आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग व पोलिस विभागात लोकांचे आरोग्य व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी भरती गरजेची आहे, अनेक ठिकाणी आता लोक कामाला नाहीत, त्या मुळे कोणताही घटक नोकरीपासून वंचित राहणार नाही, या साठी उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार योग्य निर्णय घेत आहे. कोणत्याही समाज किंवा घटकाला नोकरभरतीत वंचित ठेवले जाणार नाही अशा पध्दतीने सरकार त्यातून मार्ग काढेल, असेही पवार यांनी नमूद केले. 

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख