सोनाई संचालक किशोर माने यांना पाण्यातून काढले सुखरुप बाहेर

कळस (ता.इंदापूर) येथील ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्याबरोबर चारचाकी सहित वाहून चालले सोनाई डेअरीचे संचालक व उद्योजक किशोर माने यांना ग्रामस्थांनी व पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले.
Sonai Director Kishore Mane saved from Floods in Pune District
Sonai Director Kishore Mane saved from Floods in Pune District

वालचंदनगर : कळस (ता.इंदापूर) येथील ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्याबरोबर चारचाकी सहित वाहून चालले सोनाई डेअरीचे संचालक  व उद्योजक किशोर माने यांना ग्रामस्थांनी व पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले.

इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्हामध्ये बुधवार (ता.१४) रोजी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे कळस गावातील ओढ्याला पूर आला होता.सायंकाळी सातच्या सुमारास किशोर माने हे चालक सह कळस गावातून  रुई गावातील घराकडे चारचाकी गाडीमधून चालले होते. अचानक ओढ्यातील पाणी वाढल्याने माने यांची गाडी ओढ्याच्या पाण्यामध्ये वाहू लागली. 

माने यांनी गाडीतून बाहेर पडून एका ओढ्यातील झाडाला धरुन ठेवले होते. ग्रामस्थांनी व पोलिसांनी माने यांना दोरीच्या साहय्याने पाण्याच्या सुखरुप बाहेर काढले.ओढ्याच्या पाण्यामध्ये वाहून जात असताना माने यांचा पुर्नजन्म झाला असून देव तारी त्याला कोण मारी अशी म्हणण्या वेळ आली आहे. किशोर माने हे सोनाई उद्योग समूहाचे संचालक आहेत. 

दरम्यान, निरवांगी (ता.इंदापूर) येथील बीकेबीएन रस्त्यावरील  ओढ्याच्या पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोघाना ग्रामस्थांनी व प्रशासनाने वाचविले.सहा तासानंतर बोटीच्या एकाला बाहेर काढण्यात यश आले. या घटनेमध्ये कल्याण किसन शिंदे ( वय ३७) व अशोक मारुती देशमुख (४५, रा. दोघे  मूळ,रा. सिद्धेश्‍वर कुरोली ता.खटाव) यांना ओढ्याच्या  पुराच्या पाण्यातुन ग्रामस्थांनी व प्रशासनाने सुखरुप बाहेर काढले. 

जिल्ह्यातील पावसाच्या अन्य बातम्या
भोर : तालुक्यात तीन दिवसांच्या वादळी पावसानंतर गुरुवारी (ता.१५) दुपारनंतर पुन्हा चक्रीवादळ येण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने तालुक्यात हाय-अलर्ट जारी केला आहे. शासनाच्या सर्व कार्यालयीन प्रमुखांना त्याबाबत सूचना देण्यात आल्या असून सर्व परिस्थितीवर नजर ठेवण्यात येत आहे. अशी माहिती प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार अजित पाटील यांनी दिली. 

कुरकुंभ  : दौंड तालुक्यात पुणे - सोलापूर महामार्गाच्या दक्षिणेकडे गावांमध्ये बुधवारी ( ता. १४ ) अतिवृष्टीमुळे ओढयांना पूर येऊन मळद येथील तीन वर्षापूर्वी बांधलेला तलाव रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास फुटला. त्यामुळे ओढयाला पूर आल्याने मळद, रावणगाव येथील शेतकर्‍यांची जनावरे वाहून गेली.  परिसरातील सर्व पूल पाण्याखाली गेले तर  स्वामी चिंचोली येथील पूल वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com