राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मुलाची अलिशान गाडी झाली रुग्णवाहिका... - Pune News Minister Bharne's Son Helped Accident Victims | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मुलाची अलिशान गाडी झाली रुग्णवाहिका...

राजकुमार थोरात 
रविवार, 20 डिसेंबर 2020

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मुलाने शेळगाव(ता.इंदापूर) गावच्या हद्दीमध्ये अपघातील युवकांना मदतीचा हात देवून स्वत:ची गाडी उपचारासाठी दिल्यामुळे रुग्णांना वेळेमध्ये उपचार होण्यास मदत झाली.

वालचंदनगर : राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मुलाने शेळगाव(ता.इंदापूर) गावच्या हद्दीमध्ये अपघातील युवकांना मदतीचा हात देवून स्वत:ची गाडी उपचारासाठी दिल्यामुळे रुग्णांना वेळेमध्ये उपचार होण्यास मदत झाली.

काल शनिवार (ता.१९) रोजी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास  इंदापूर- बारामती राज्यमार्गावर शेळगाव गावच्या हद्दीमध्ये भरधाव वेगाने चाललेल्या चारचाकी गाडीने दोन दुचाकीला धडक दिल्यामुळे विचित्र अपघातामध्ये अपघातामध्ये मयूर चव्हाण, सौरभ काळे व वैभव काटकर (रा.सणसर) व आनंद राम देवाशी (मूळ रा.राजस्थान) हे चार दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालक पळून गेला. 

नागरिकांनी अपघात बघण्यासाठी गर्दी केली होती. मात्र मदत करण्याऐवजी नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतल्याने जखमी रस्त्यालगत पडून होते. याच दरम्यान  राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे विवाहसोहळा उरकून घराकडे चालले होते. रस्त्यावरची गर्दी पाहून श्रीराज भरणे व त्यांचे सहकारी  अंबादास लांडगे थांबले. भरणे यांनी तातडीने जखमींना उचलून स्वत:ची चारचाकी गाडीत ठेवले. व उपचारासाठी दवाखान्यामध्ये पाठविले. त्यामुळे जखमींना वेळेमध्ये उपचार मिळण्यास मदत झाली. 

श्रीराज भरणे यांच्या मदतीचे कौतुक समाजामधून कौतुक होत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे देखिल अपघातग्रस्त मुलांना स्वत:ची गाडी देवून स्वतः दुचाकीवरुन घरी गेले होते.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख