हुश्यssssबारामती शहर झाले कोरोनामुक्त; दोन महिन्यांपासून एकही रुग्ण नाही

सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणांवर प्रशासनाने केलेले नियंत्रण, कडक लॉकडाऊन, सुरुवातीला राबवलेला भीलवाडा पॅटर्न व नंतरचा बारामती पॅटर्न, लोकांचा प्रशासनाच्या प्रयत्नांना मिळालेली उस्फूर्त साथ या एकत्रित प्रयत्नांमुळे बारामती शहर कोरोनाला रोखण्यात यशस्वी झाले.
No New corona Patient Found in Baramati for Last Sixty Days
No New corona Patient Found in Baramati for Last Sixty Days

बारामती : शहरात गेल्या साठ दिवसांपासून म्हणजेच कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसल्याने आता बारामती शहर आता ख-या अर्थाने कोरोनामुक्त झाले आहे. प्रशासकीय स्तरावर झालेले उत्तम प्रयत्न व त्याला बारामतीकांकडून मिळालेली साथ यामुळे साध्य करता आले आहे.

सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणांवर प्रशासनाने केलेले नियंत्रण, कडक लॉकडाऊन, सुरुवातीला राबवलेला भीलवाडा पॅटर्न व नंतरचा बारामती पॅटर्न, लोकांचा प्रशासनाच्या प्रयत्नांना मिळालेली उस्फूर्त साथ या एकत्रित प्रयत्नांमुळे बारामती शहर कोरोनाला रोखण्यात यशस्वी झाले. बारामती शहरात गेल्या साठ दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी कोरोनाचा उद्रेक होता.  निर्बंध शिथील झाल्यानंतर या ठिकाणांहून तसेच राज्याच्या अन्य भागांतून झाल्यावर लोक बारामतीतमध्ये आले. मात्र, किमान दहा दिवस स्वतःला घरात क्वारंटाईन करुन घेण्याचे पथ्य सर्वांनीच पाळले. त्यामुळे कोरोनाला बारामतीत हातपाय पसरता आले नाहीत. 

रुई रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरु

इंदापूर व दौंडमध्ये कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बारामती शहर मात्र कोरोनापासून दूर राहिले आहे. बारामतीतील रुई रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. जर कुणाला संसर्ग झाल्याचा संशय आल्यास तातडीने त्याच्या घशातील स्वॅब येथे संकलित केले जातात. पुरुष व महिलांसाठी या ठिकाणी अतिदक्षता विभागही उभारण्यात आला आहे. गरज भासल्यास रुग्णांना येथे ठेवून घेतले जाते व उपचार केले जातात. 

बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच आता कोरोनाची तपासणी होते. त्यामुळे त्यासाठी पुण्याला जाण्याची आवश्यकता पडत नाही. त्यामुळे वेळ, इंधन व पैसा या सगळ्यांचीच बचत होते आहे. बारामतीचै दैनंदिन जीवन गेल्या काही दिवसांपासून सुरु झाले आहे.  प्रशासनाने  सकाळी नऊ ते पाच या वेळेत काही अपवाद वगळता व्यवसायास परवानगी दिली आहे. बहुसंख्य दुकानदार सॅनेटायझरचा वापर, मास्कचा वापर, हँडग्लोव्हजचा वापर, येणा-या ग्राहकांचा तपशिल नोंदवून ठेवणे ही पथ्ये नियमितपणे पाळतात. 

अजून थोडी शिथिलता हवी

बारामतीत सायंकाळी पाच वाजता दुकाने बंद होतात. त्याऐवजी किमान सात वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी. कामावर जाणा-यांना खरेदी करणे त्यामुळे शक्य होत नाही. अनेक जण सकाळी आठ वाजता कामाला जातात आणि सायंकाळी सहानंतर घरी येतात. अशांचा विचार व्हायला हवा - नरेंद्र गुजराथी, अध्यक्ष, बारामती व्यापारी महासंघ, बारामती. 

हॉटेलला परवानगी द्या

लाॅकडाऊनमुळे बारामती शहरातील हॉटेल्स तीन महिन्यांपासून बंद आहेत. आता बारामती कोरोनामुक्त झाली. त्यामुळे आता हॉटेल्स सुरु करण्यास परवानगी देण्यास हरकत नाही. शासन स्तरावर घालून दिलेल्या नियमांचे पालन सर्व हाॅटेल व्यावसायिकांकडून केले जाईल - प्रवीण आहुजा, हॉटेल व्यावसायिक.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com