आमदार पवारांनी उभारलेल्या कोविड सेंटरमधील सुविधांची नीलेश लंकेंनाही भूरळ - MLA Nilesh Lanke will visit Kovid Center at Pimple Jagtap | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

आमदार पवारांनी उभारलेल्या कोविड सेंटरमधील सुविधांची नीलेश लंकेंनाही भूरळ

भरत पचंगे
शनिवार, 22 मे 2021

केवळ पंधराशे रुपयांत सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध करून दिली.

शिक्रापूर (जि. पुणे)  ः सर्व कोविड रुग्णांसाठी सीटीस्कॅन (CTscan) तपासणीचे दर निम्मे करा, अशी सूचना आमदार अशोक पवार (MLA Ashok Pawar) यांनी करताच शिक्रापूर (ता. शिरूर) येथील मंगल मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रवींद्र टेमगिरे (Dr. Ravindra Temgire) व डॉ.स्मिता टेमगिरे (Dr. Smita Temgire) यांनी ता. 22 मेपासून केवळ पंधराशे रुपयांत सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध करून दिली. आज पहिल्याच दिवशी तब्बल 25 रुग्णांना त्याचा फायदा झाला. 

दरम्यान, पिंपळे जगताप (Pimple Jagtap) येथील चौफुल्यातील कोविड सेंटरमध्ये (Covid Center) मिळणाऱ्या सुविधांची पारनेरचे आमदार नीलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनाही भूरळ पडली आहे. त्यांनी हे सेंटर चालविणारे प्रफुल्ल शिवले (Prafulla Shivale) यांना फोन करत आपण लवकरच चौफुल्याच्या कोविड सेंटरमधील सुविधा पाहण्यासाठी येणार असल्याचे सांगितले आहे. (MLA Nilesh Lanke will visit Kovid Center at Pimple Jagtap)

मागील वर्षीच्या मार्चपासून कोवीड-19 रुग्णांचे संख्या शिक्रापूर व परिसरात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कोवीड रुग्णांसाठी आवश्यक अशी एचआरसीटी सीटीस्कॅन (छातीचा सीटी स्कॅन) सुविधा वाघोली ते शिरुरच्या दरम्यान केवळ शिक्रापूर येथील मंगल मेडिकल फाउंडेशनच्या सूर्या हॉस्पिटलमध्ये होती. त्याचा शासकीय दर प्रती स्कॅनप्रमाणे 2500 ते 3000 रुपयांच्या दरम्यान होता. 

हेही वाचा : खडसे, शेट्टी, मातोंडकर यांच्या आशा पल्लवीत : राज्यपालांच्या सचिवांना नोटीस

आमदार अशोक पवार यांच्या पुढाकाराने पिंपळे-जगताप (चौफुला) व शिक्रापुरात 300 बेड क्षमतेची दोन कोवीड केअर सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत. येथे दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी अनेकांना सीटीस्कॅनची गरज होती. सामान्य कुटुंबातील रुग्णांना सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात हे दर परवडत नव्हते. ते दर कमी करावेत; म्हणून आमदार अशोक पवार यांनी चौफुला येथील कोविड सेंटरचे चालक माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांच्या समवेत डॉ. रवींद्र टेमगिरे यांची भेट घेतली. आमदार पवार यांनी दर कमी करण्याची सूचना करताच सर्व कोवीड रुग्णांसाठी सीटीस्कॅनचे दर प्रती रुग्ण 1500 केल्याचे त्यांनी जाहीर केले. 

दरम्यान, ही सुविधा आजपासून (ता. 22) सुरू होताच पहिल्याच दिवशी या सवलतीच्या दराचा तब्बल 25 जणांना लाभ झाल्याची माहिती डॉ. स्मिता टेमगिरे यांनी दिली. ही सुविधा घेण्यासाठी कुठल्याही कागदपत्राची गरज नसून केवळ चौफुला व शिक्रापुरातील कोविड सेंटर्समधील डॉक्टर्स किंवा तेथील प्रतिनिधींच्या तोंडी सूचनाही पुरेशा असल्याचे डॉ. टेमगिरे यांनी सांगितले. 

बऱ्या होणाऱ्या रुग्णांना विविध रोपे देऊन डिस्चार्ज

आमदार अशोक पवार यांच्या प्रेरणेने पिंपळे जगताप येथील चौफुल्यात कोवीड सेंटर सुरू केले आहे. या सेंटरमध्ये 24 तास दोन अ‍ॅंब्यूलन्स, स्क्रीनची सुविधा, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र वार्ड, आयुर्वेदीक नाष्टा, योगा, कोविडमधून बऱ्या होणाऱ्या रुग्णांना विविध रोपे देऊन डिस्चार्ज देणे आणि आता केवळ 1500 रुपयांत सीटी-स्कॅनची सुविधा आम्ही आमच्या सेंटरमध्ये सुरू केली आहे. याबाबची माहिती मिळताच नगर जिल्ह्यात 1000 रुग्णांचे कोवीड सेंटर चालविणारे आमदार नीलेश लंके यांनी आज सकाळीच फोन करून या सुविधेबद्दल कौतुक केले. चौफुला येथील कोविड सेंटरला भेट द्यायला लवकरच येणार आहे, असेही त्यांनी सांगितल्याची माहिती प्रफुल्ल शिवले यांनी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख