कोरोनाविरूद्धच्या लढ्यात पुणेकरांना सुरक्षा कवच देणारे कोरोना योद्धे! - Corona Worriors in Pune municipal Corporation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

कोरोनाविरूद्धच्या लढ्यात पुणेकरांना सुरक्षा कवच देणारे कोरोना योद्धे!

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 11 मे 2021

पुणे महापालिकेच्या आयुक्तांपासून अतिरिक्त आयुक्त, वैद्यकीय अधिकाऱ्यांची तब्बल १८-२० हजाराची फौज गेली सव्वा वर्षे रस्त्यांवर उतरून कोरोनावर मात करीत आहे.

पुणे : एकीकडं रोजचे तीन-चार हजार रुग्ण, रोज शंभर-सव्वाशे नवे बेड उभारूनही ते कमीच पडतायेत. भरीस भर म्हणून की काय ऑक्सिजनची टंचाई, कुठे तो कमी पडतोय; तर कुठे वाया जातोय... मग पुण्यातली स्थिती हाताबाहेर जाण्यावरून न्यायालय, सरकार आणि पुणे महापालिकेत वाद रंगतोय. पण कोरोनाच्या हाहाकारातही पुणेकर सुरक्षित राहावेत, या उद्देशाने पुणे महापालिकेच्या आयुक्तांपासून अतिरिक्त आयुक्त, वैद्यकीय अधिकाऱ्यांची तब्बल १८-२० हजाराची फौज गेली सव्वा वर्षे रस्त्यांवर उतरून कोरोनावर मात करीत आहे.

या मोहिमेत आयुक्त विक्रम कुमार, तेवढच्या ताकदीने लढणाऱ्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जागा मिळेल तिथे हॉस्पिटल उभारून, उपचार व्यवस्था करणारे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, कोरोनाविरोधातील मोहिमेचे नेतृत्व करणारे साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. संजीव वावरे, जागोजागी १२ हजारांहून (कोविड केअर सेंटरमध्ये) अधिक बेडची सोय करण्यापासून कोविड हॉस्पिटलचे 'जम्बो' व्यवस्थापन करणारे उपायुक्त राजेंद्र मुठे यांना रोज १६ ते १८ तास कामात राहावे लागत असल्याचे त्यांच्या धावपळीतून दिसून येत आहे.

हेही वाचा : दिलासादायक : कोरोना रुग्णांच्या क्रमवारीत महाराष्ट्राची घसरण सुरू

नवे रुग्ण शोधून काढण्यापासून त्यांच्याकरिताची उपचार व्यवस्था, त्यासाठीचे डॉक्टर उपचारानंतर रुग्णांना बरे करण्यापर्यंत आणि नवे उपाय, महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणीत कुमार, अग्रवाल हेच पुढे असतात. दिवसभरात बैठका, कामांचा आढावा घेऊन झाल्यानंतर कुमार आणि अग्रवाल हे हॉस्पिटलला भेटी देतात. प्रसंगी खासगी रुग्णालयांतली बेड ताब्यात घेण्यासाठीही त्यांनाच जावे लागत असल्याचेही दिसत आहे.

विक्रम कुमार : कोरोनाच्या साथीत गेल्या वर्षी १२ जुलैला आयुक्तपदावर रुजू झालेल्या आयुक्त विक्रम कुमार यांनी गेल्या दहा महिन्यांत एकही सुट्टी (काही साप्ताहित सुट्या वगळता) घेतलेली नाही. या काळात रोज सकाळी दहा ते रात्री आठ-दहा वाजेपर्यंत आपल्या कार्यालयातील बैठकांत असतात तेव्हा, अधिकाऱ्यांपासून गाऱ्हाणी घेऊन येणाऱ्यांना महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांशी चर्चेलाही कुमार यांचे तितकेच प्राधान्य असते. कोरोनाच्या उपायांसोबतच आणि शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी रखडणार नाही, यासाठी खातेप्रमुखांच्या बैठका घेऊन कामांचा आढावा घेतात. कार्यालयांतन रात्री बाहेर पडताना जम्बो हॉस्पिटलपासून शक्य त्या हॉस्पिटल कुमार गेली देऊन उपचार व्यवस्थेचा आढावा घेतात. पंधरा दिवसांपूर्वी सलग तीन दिवस पहाटे तीन-साडेतीन वाजेपर्यंत जागे राहून कुमार यांनी ऑक्सिजनच्या साठ्याचे नियोजन केल्याचे त्यांचे सहकारी सांगतात.

रुबल अग्रवाल : एकेकाळी बेभरवशाची असलेल्या महापालिकेची रुग्णालये आणि जम्बो हॉस्पिटलमधील उपचार व्यवस्थेची 'सर्जरी' करून आधी आपली व्यवस्था ठणठणीत केलेल्या रुबल अग्रवालही रोज किमान १५-२० बैठका घेतात. बैठकांच्या सपाट्यातून वेळ काढून त्या रोज तीन चार तास तरी जम्बो अन्य आणि स्णालयांत जातात. एकाच ठिकाणी सर्वाधिक रुग्ण असलेल्या जम्बो हॉस्पिटलमध्ये नेमक्या कोणत्या रुग्णावर काय उपचार सुरू आहेत, रुग्ण कितपत बरा झाला आहे, त्याला नव्या उपचाराची गरज आहे का, हेही अग्रवाल प्रत्यक्ष जाऊन तपासतात. महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी डॉक्टर आणि अन्य घटकांसोबत बैठका, चर्चेसाठी अग्रवाल या रोज सकाळी दहा-पावणेदहा वाजल्यापासूनच कार्यालयात येतात. त्यात दीड-पावणेदोन फोनलाही त्या उत्तरे देतात सुटीच्या दिवशीही त्या कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या असतात.

राजेंद्र मुठे : क्रिटीकल पेशंटच्या जिवाशी खेळणाऱ्या जम्बो हॉस्पिटलमधील जुन्या एजन्सींना हटविल्यानंतर 'जम्बो'च्या व्यवस्थापनात महत्वाची भूमिका उपायुक्त राजेंद्र मुठे यांच्याकडे आहे. एकीकडे रोजची रुणसंख्या सहा हजाराच्या घरात असतानाच जम्बोला ऑक्सिजन अपुरे पडण्याची भीती मुठे यांच्या पुढाकारातून संपली. जम्बोच्या दारात येणाऱ्या गरीब रुग्णांना विनाअडथळा उपचार मिळतील, याला मुठे यांचे प्राधान्य असते. त्यासाठी ते रोज काही वेळ जम्बोत आवर्जून जातात. त्याचवेळी नव्या कोविड सेंटर उभारणीचे नियोजन, त्यासाठीच्या जागा पाहणीसाठी ते प्रत्यक्ष 'स्पॉट' वर जातात. तिसऱ्या लाटेसाठी आतापासून पुरेसे बेड उपलब्ध व्हावेत, यासाठी मुठे आणि त्यांची टीम 'मास्टर प्लॅन' आखत आहे. ज्यामुळे पुढच्या टप्प्यात बेड सहज उपलब्ध होतील. एवढेच नाही तर महापालिकेच्या मिळकती शोधून काढण्यासाठी मुठे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे 

डॉ संजीव वावरे : पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून म्हणजे गेल्यावर्षी ९ मार्चपासून कोरोना मोहिमेचा एक भाग असलेले अधिकारी म्हणजे, डॉ. संजीव वावरे. नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकत्यांचे दिवसभरातले किमान पाचशे तरी फोन घेणारे डॉ. वावरे हे पेशंटला बेड देण्यापासून त्यांच्यासाठीची औषधे, रोजच्या चाचण्या (टेस्ट), त्यासाठीचे कीट, मनुष्यबळ याच्याच नियोजनात अडकलेले असतात. सकाळी दहा वाजल्यापासूनच दालनातील गर्दीतून वाट काढून ते वरिष्ठांच्या बैठकांना हजेरी लावतात. महापालिकेच्या आठ रुग्णालयांच्या व्यवस्थापनासह नव्याने ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेड उभारण्यासाठी डॉ. वावरे यांना खासगी हॉस्पिटलमध्ये जावे लागते. रुग्णसंख्या वाढल्यापासून सकाळी साडेनऊ-दहा वाजता महापालिकेच्या दिशेने निघणारे डॉ. वावरे रात्री ११ वाजताही घरी परतण्याची शक्यता नसते. रात्री दहानंतर त्यांच्याकडे रुग्ण संख्या चाचण्या यांची माहिती एकत्रित करण्याची कामे असतात.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख