पुण्यात रोज पन्नासहून अधिक रुग्ण होताहेत 'कोरोना'मुक्त...पण अजून संयम हवा!

एकूण 'पॉझिटिव्ह' पैकी आज घडीला केवळ ६५ टक्केच रुग्ण हॉस्पिटलमध्ये आहेत. हे प्रमाण गेल्या आठवड्यात ७९ टक्के इतके होते. म्हणजे, गेल्या सातच दिवसांत रुग्ण संख्या १२ टक्क्यांनी कमी झाली आहे. ही बाब पुणेकरांसाठी दिलासा देणारी असली तरी, लोकांनी रस्त्यांवर गर्दी करण्याची ही वेळ नाही
Average Fifty Patients Recovering From Corona in Pune Every Day
Average Fifty Patients Recovering From Corona in Pune Every Day

पुणे : पुणेकरांनो तुम्ही कोरोनाला हरवू शकताय; त्याला पुण्यात हद्दपारही करू शकाल...तशी पावले तुमच्याकडून पडतायेत...आणि म्हणूनच गेल्या आठवड्यात तब्बल पावणेचारशे पुणेकर कोरोनावर मात करीत ठणठणीत झालेत आणि घरीही परतलेत...आता रोज पन्नासहून अधिक कोरोना बाधित बरे होताहेत. 

ही आकडेवारी पाहिली तर एकूण 'पॉझिटिव्ह' पैकी आज घडीला केवळ ६५ टक्केच रुग्ण हॉस्पिटलमध्ये आहेत. हे प्रमाण गेल्या आठवड्यात ७९ टक्के इतके होते. म्हणजे, गेल्या सातच दिवसांत रुग्ण संख्या १२ टक्क्यांनी कमी झाली आहे. ही बाब पुणेकरांसाठी दिलासा देणारी असली तरी, लोकांनी रस्त्यांवर गर्दी करण्याची ही वेळ नाही. तरीही होणारी गर्दी चिंतेची बाब ठरू शकते याकडे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी लक्ष वेधले आहे.

बरे होणाऱ्यांची संख्याही वाढतेय

पुणे शहरात २० ते २८ मे या कालावधीत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढले. याआधी सर्वाधिक ६५ रुग्ण असतानाच अचानक एके दिवशी हा आकडा १२२ पर्यंत गेला आणि अवघे पुणे हादरले. तेव्हाच, पुण्यातील कोरोनाच्या संसर्गाबाबत केंद्रीय पथकानेही चिंता व्यक्ती केली. नव्या रुग्णांची संख्या पुढची काही दिवस कमी होण्याचे नाव घेत नव्हती. २८ मेनंतर मात्र रोज ८० ते ९० रुग्ण सापडत राहिले. पुढे काही दोन ६०-६५ रुग्ण सापडले. परंतु, याच तारखेपासून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत राहिली; गेल्या नऊ दिवसांपासून रोज ५० हन अधिक रुग्ण ठणठणीत होऊन घरी जात असल्याच्या आकड्यांची नोंद झाली आहे. 

या कालावधीत ४११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे २५ एप्रिलपासून आतापर्यंत ५८८ कोरोनाबाधित बरे झाले आहेत. तर, आतापर्यंत नोंद झालेल्या २ हजार २९ रुग्णापैकी ५८३ जण बरे आणि १११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या १ हजार ३३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

एकीकडे रोज बरे होत असलेल्यांची संख्या पन्नाशीच्या पुढे राहिली आहे; तर मृतांचे प्रमाणही कमी झाल्याने पुणेकरांना दिलासा मानला जात आहे. तरीही, गेल्या चार दिवसांतील रस्त्यांवरील लोकांची गर्दी ही नवी भीती समोर आणत आहे. 

पुढचे काही दिवस महत्त्वाचे 

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या, "पुण्यात कोरोना रोखण्याला सुरवात झाली आहे. ती पुणेकरांच्या सतर्कतेमुळे शक्य होत आहे. सध्या कोरोनामुक्त होणाऱ्यांमुळे दिलासा मिळत आहे. परंतु, यापुढचे काही दिवस खूपच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पातळीवर काळजी घ्यावयाची आहे. तसे झाल्यास नव्या 'लॉकडाउनचा मुहुर्त शोधावा लागणार नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com