गड्या एक दिवस थांबायच होतंस... 

त्याला सर्दी, खोकला अन ताप होता, दवाखान्यात गेल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून त्याच्या घशातील द्रवाचे नमुने घेण्यात आले. पण त्याने कोरोनाच्या भीतीपोटी आत्महत्या केली. आज आलेला त्याचा कोरोनाचा अहवाल होता "निगेटिव्ह'. तो फक्त एक दिवस थांबला असता तर...?
 Young Man Suicide of fear of Corona
Young Man Suicide of fear of Corona

पुणे : त्याला सर्दी, खोकला अन ताप होता, दवाखान्यात गेल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून त्याच्या घशातील द्रवाचे नमुने घेण्यात आले. रुग्णालयात ठेवण्यात आले, पण त्याने कोरोनाच्या भीतीपोटी आत्महत्या केली. आज आलेला त्याचा कोरोनाचा अहवाल होता "निगेटिव्ह'. तो फक्त एक दिवस थांबला असता तर...? 

खडकी परिसरात राहणाऱ्या एका तरुणास सर्दी, खोकला व ताप अशी लक्षणे होती. त्यामुळे तो गुरुवारी दुपारी रुग्णालयात तपासणीसाठी गेला होता. तेथे त्याचे कोरोना तपासणीसाठी घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते.

दरम्यान, त्यास श्वास घेण्यास अचानक त्रास होऊ लागल्याने बोपोडी येथील खेडेकर रुग्णालयात हलवण्यात आले. त्याचा कोरोना तपासणी अहवाल शुक्रवारी येणार होता. मात्र आपल्याला कोरोना झाला आहे, अशी त्यास भीती वाटत होती. दरम्यान गुरुवारी रात्री साडे नऊ वाजता पावसामुळे वीज गेली होती, त्यामुळे काही क्षणात पडलेल्या अंधाराचा फायदा घेऊन हा तरुण रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवर गेला आणि तेथून उडी मारुन त्याने आत्महत्या केली. 

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा कोरोना तपासणी अहवाल शुक्रवारी संध्याकाळी आला. त्या तरुणाचा अहवाल "निगेटिव्ह' आल्याचे खडकी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) शफीक पठाण यांनी सांगितले. "निगेटिव्ह' म्हणजे त्याला कोरोना झालेला नव्हता. कोरोना अहवाल दुसऱ्या दिवशी येतो, किमान त्याचा रिपोर्ट काय होता, हे या तरुणाने जाणून घेतले असते, एक दिवस थांबला असता तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. 

दरम्यान, पुणे महापालिकेच्या बोपोडी येथील खेडेकर रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तरुणाने आत्महत्या केली होती. ही घटना गुरुवारी (ता. 14) रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडली होती.

खडकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण खडकीतील होता. त्याला गुरुवारी दुपारी शिवाजीनगर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्याची कोरोना तपासणी करण्यासाठी घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. दरम्यान, त्याला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे बोपोडी येथील खेडेकर रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्याचा कोरोना तपासणी अहवालही प्रतीक्षेत होता. मात्र आपल्याला कोरोना झाला आहे, या भीतीने त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी त्या वेळी वर्तविला होता. याबाबतचा तपास सहायक पोलिस निरीक्षक कोळी करीत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com