तुम्हाला धक्का बसेल...माजी आमदार वाहताहेत विजेचे खांब ! 

जंगलात, डोंगरभागात पडलेले खांब त्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी रस्त्यांची सोय नाही. अशा ठिकाणी माणसांच्या मदतीने हे खांब खांद्यावरून वाहून न्यावे लागतात. माजी आमदार शरद ढमाले यांनीही स्वतः या कामात सहभाग घेत खांद्यावरून खांब वाहून नेले. त्यांनी आदिवासींना मदतीला घेऊन विद्युत वितरण कंपनाला सहकार्य केले आणि येथील 37 गावांत पुन्हा वीजपुरवठा सुरुळीत सुरू झाला.
You will be shocked ... Former MLAs are flowing electricity poles
You will be shocked ... Former MLAs are flowing electricity poles

भुकूम (जि. पुणे) : मुळशी तालुक्‍यातील मुळशी धरण भागात नुकतेच झालेल्या निसर्ग चक्री वादळामुळे 196 विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील चाळीस गावांतील वीज गायब झाली होती.

जंगलात, डोंगरभागात पडलेले खांब त्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी रस्त्यांची सोय नाही. अशा ठिकाणी माणसांच्या मदतीने हे खांब खांद्यावरून वाहून न्यावे लागतात. माजी आमदार शरद ढमाले यांनीही स्वतः या कामात सहभाग घेत खांद्यावरून खांब वाहून नेले. त्यांनी आदिवासींना मदतीला घेऊन विद्युत वितरण कंपनाला सहकार्य केले आणि येथील 37 गावांत पुन्हा वीजपुरवठा सुरुळीत सुरू झाला. 

निसर्ग चक्री वादळामुळे मुळशी धरण भागातील चाळीस गावांतील खांब पडल्याने वीज गेली होती. हा भाग डोंगर दऱ्यांचा आहे, त्यामुळे पडलेले खांब पावसात उभे करणे कठीण होते. पूर्वीचे अनेक लोखंडी व सिमेंटचे खांब तुटले. तसेच, महावितरण कंपनीने आणलेले कामगार खानदेशातील होते. त्यांना अशा भागात काम करणे अवघड जात होते. अशा वेळी ढमाले यांनी पुढाकार घेऊन येथील आदिवासींना एकत्र केले. त्यांच्या बरोबर स्वतः खांबांची वाहतूक करणे, खड्डे घेणे, खांब उभे करण्याचे काम केले. 

येथील डोंगर दरीतील खांब रस्त्याच्या कडेने घेण्याचे विद्युत वितरण कंपनीला सुचविले. त्याप्रमाणे डोंगरांतील चांगले खांब वाहून आणले. तसेच तुटलेल्या खांबांच्या ठिकाणी नवीन खांब उभारण्यात आले आहेत. या कामासाठी भरे येथील अभियंता पी. के. फड, माले येथील शाखा अभियंता ए. पी. प्रभुदेसाई यांनी पुढाकार घेतला होता. नुकतीच विभागीय संचालक अंकुश लहाने यांनी कामाची पाहणी केली. 

मुळशी तालुक्‍यातील 37 गावांचा वीज पुरवठा आता पूर्ववत झाला आहे. येथील तैलबैल व परिसरातील तीन गावांचे काम अद्याप बाकी आहे. येथील काम अवघड परिसरातील आहे. त्यामुळे या ठिकाणी काम करणे थोडे कठीण आहे. विजेचे खांब उभारून त्या ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी श्रमदानासाठी पुढे यावे, असे आवाहन, माजी आमदार शरद ढमाले यांनी केले आहे. 

मुळशी धरण भागातील वांद्रे हे माजी आमदार ढमाले यांचे छोटेसे गाव आहे. लहानपणापासून ते येथील आदिवासींमध्ये राहिले आहेत. तसेच, लहानपणापासून शेतीत कष्ट करायची त्यांना सवय आहे. मुळशी धरणही त्यांनी पोहून पार केले आहे. 

Edited By : Vijay Dudhale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com