उपमुख्यमंत्री अजित पवारांना शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नाही का? : भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांचा सवाल  - Work on Pune water supply scheme started under police protection | Politics Marathi News - Sarkarnama

उपमुख्यमंत्री अजित पवारांना शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नाही का? : भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांचा सवाल 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 जून 2020

राज्य राखीव पोलिस दलाचे 2 अधिकारी, तर 66 कर्मचारी, शीघ्र कृती दलाचा 1 अधिकारी, तर 27 कर्मचारी आणि पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील 7 अधिकारी 60 कर्मचारी असे एकूण 10 अधिकारी आणि 153 कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते. हा एवढा बंदोबस्त पाहून तुम्ही म्हणाल की दंगलसदृश्‍य परिस्थिती हाताळण्यासाठीचे हे नियोजन असावे. पण, जरा थांबा हा बंदोबस्त आहे, भामा आसखेड धरण ते पुणे जलवाहिनीचे शेतकऱ्यांनी अडविलेले काम सुरू करण्यासाठी. 

आंबेठाण : राज्य राखीव पोलिस दलाचे 2 अधिकारी, तर 66 कर्मचारी, शीघ्र कृती दलाचा 1 अधिकारी, तर 27 कर्मचारी आणि पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील 7 अधिकारी 60 कर्मचारी असे एकूण 10 अधिकारी आणि 153 कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते. हा एवढा बंदोबस्त पाहून तुम्ही म्हणाल की दंगलसदृश्‍य परिस्थिती हाताळण्यासाठीचे हे नियोजन असावे. पण, जरा थांबा हा बंदोबस्त आहे, भामा आसखेड धरण ते पुणे जलवाहिनीचे शेतकऱ्यांनी अडविलेले काम सुरू करण्यासाठी. 

पुनर्वसनासह अनेक मागण्या प्रलंबित असल्याने आजवर अनेकदा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जॅकवेल आणि जलवाहिनीची कामे बंद पाडली होती. परंतु त्यानंतर सर्वानुमते एक किलोमीटर जलवाहिनीचे काम बंद ठेऊन अन्य कामे मार्गी लावण्याचे ठरले होते. पण, आता सरकारने जबरस्तीने हे काम सुरू केल्याने शेतकऱ्यांनी हे काम आसखेड खुर्द (ता. खेड) येथे सोमवारी (ता. 1) अडविल्याने ते बंद करावे लागले होते. त्या वेळी शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. 

दरम्यान, आसखेड खुर्द येथे मागील अडीच वर्षांपासून थांबविण्यात आलेले पुणे जलवाहिनीचे एक किलोमीटर लांबीचे काम मंगळवारी (ता. 2) प्रचंड पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आले. हे काम सुरू करण्यासाठी पोलिस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त राम जाधव, पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली 10 अधिकारी आणि 153 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या वेळी तहसीलदार सुचित्रा आमले, मंडलाधिकारी राजेंद्र वाघ, तलाठी बंडू आवटे, पुणे महापालिकेचे शाखा अभियंता मनोज गाठे, उपअभियंता निवृत्ती उतळे उपस्थित होते. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुरू असणाऱ्या रस्ता दुरुस्तीला अडचण होत असल्याने काम तत्काळ सुरू करण्यात आले असल्याचे पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. काम बंद ठेवण्याची जागा पुणे महापालिकेनेच सुचविली होती, तसे त्यांनी तीन वर्षांपूर्वी लेखी दिले होते, त्याचे आता काय झाले? असा सवाल शेतकरी विचारत आहे. 

रस्ता दुरुस्तीला अडचण होत आहे, असे सांगणे म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नाही का? असाही सवालही या वेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला. शेतकरी या कोरोना काळात घराबाहेर पडले आणि काही समस्या निर्माण झाली, तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असा इशारा या वेळी शेतकऱ्यांनी दिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख