शिवसैनिक म्हणतोय...माउलींच्या पादुका नेणाऱ्या हेलिकॉप्टरचा खर्च उचलणार ! 

दिघीतील शिवसेनेचे विभागप्रमुख संतोष वाळके यांनी आळंदी देवस्थानकडे निवेदनाद्वारे एक मागणी केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आषाढीचे पालखी सोहळ्यात बदल करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुका राज्य सरकार हेलिकॉप्टर किंवा बसद्वारे पंढरीत नेणार असल्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला आहे.
शिवसैनिक म्हणतोय...माउलींच्या पादुका नेणाऱ्या हेलिकॉप्टरचा खर्च उचलणार ! 
Will pay for the helicopter carrying Mauli's paduka :

आळंदी : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे या वर्षी संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा राज्य सरकारने वारकरी संप्रदायाशी चर्चा करून रद्द केला आहे. यंदा पंढरपूरला पायी पालखी सोहळा जाणार नाही, त्याऐवजी या संतांच्या पादुका हेलिकॉप्टर अथवा बसच्या माध्यमातून पंढरपूरला आषाढी वारीसाठी नेल्या जाणार आहेत. 

दरम्यान, दिघीतील शिवसेनेचे विभागप्रमुख संतोष वाळके यांनी आळंदी देवस्थानकडे निवेदनाद्वारे एक मागणी केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आषाढीचे पालखी सोहळ्यात बदल करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुका राज्य सरकार हेलिकॉप्टर किंवा बसद्वारे पंढरीत नेणार असल्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला आहे.

माउलींच्या पादुका नेण्यासाठी राज्य सरकार देत असलेल्या हेलिकॉप्टर किंवा बसचा संपूर्ण खर्च आम्ही उचलतो. ती जबाबदारी आम्हाला द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख संतोष वाळके यांनी केली आहे. 

संतोष वाळके यांनी हे निवेदन आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड विकास ढगे यांना दिले आहे. संतोष वाळके यांनी निवेदनामध्ये म्हटले की, आमच्या घरात पंढरीच्या वारीची आणि अन्नदान करण्याची परंपरा आहे. पालखी मार्गावर दिघी येथे माउलींचा सोहळा आल्यानंतर दरवर्षी जोरदार स्वागत करण्यात येते. आमचे संपूर्ण कुटूंबच वारकरी असून संत ज्ञानेश्‍वर माउलींवर आमची अढळ श्रद्धा आहे. 

यंदा मात्र कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे भव्य पायी पालखी सोहळा नसणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी कोणत्याच प्रकारची सेवा आमच्या कुटूंबाकडून होणार नाही. ही खंत राहू नये, या साठी माउलींच्या पादुका मोजक्‍या व्यक्तींना सोबत घेऊन हेलिकॉप्टर अथवा बसद्वारे राज्य सरकारकडून पंढरपुरात नेल्या जाणार आहेत, अशी घोषणा काही दिवसांपूर्वी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

माउलींचा सेवक म्हणून हा खर्च उचलण्याची जबाबदारी आपल्याला मिळावी, अशी विनंती वाळके यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. 

मुंबईच्या डबेवाल्यांना नीलम गोऱ्हे यांची मदत 

मुंबई : कोरोनाच्या विषाणूमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक जण अडचणीत आले आहेत. दिवसभर काम करावे, त्या वेळी दोन वेळचे जेवण मिळते, अशा हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांचे मोठे हाल झाले. याच लॉकडाउनमुळे मुंबईचा डबेवालाही आर्थिकदृष्ट्या अडचणी आला होता. 

संपूर्ण मुंबई आणि कार्यालये बंद असल्याने डबेवाल्यांचे हक्काचे काम ठप्प झाले होते. डबे पोचवून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नावर त्यांचे घर चालायचे. पण, लॉकडाउनमुळे रोजगार बंद झाल्याने डबेवाल्यांची परिस्थिती बिकट बनली होती. काही डबेवाल्यांच्या घरी खायला अन्नही नव्हते, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. 

अशा वेळी शिवसेना नेत्या, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे या डबेवाल्यांच्या मदतीला धावून गेल्या आहेत. "ऍक्‍शन ऍड'च्या निरजा भटनागर यांच्या मार्फत आज अंधेरी, दहिसर, बोरिवली येथील डबेवाल्यांना रेशनच्या किटचे वाटप करण्यात आले. नीलम गोऱ्हे यांच्या माध्यमातून धान्य उपलब्ध झाल्याने डबेवाल्यांच्या कुटुंबीयांना काही दिवसांसाठी तरी आधार मिळालेला आहे. 

आमदार नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने आणि नीरजा भटनागर यांच्या सहकार्याने मुंबईतील डबेवाल्यांना रेशनिंगचे धान्य मिळाले आहे. मुंबई डबेवाला असोसिएशन त्यांचे आभारी आहे, अशा शब्दांत मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in