खासदार डॉ. अमोल कोल्हे का झाले ट्रोल?  - Why MP Dr. Amol Kolhe became a troll? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

खासदार डॉ. अमोल कोल्हे का झाले ट्रोल? 

उत्तम कुटे 
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

वयाचे शतक साजरे करणाऱ्या एका आदरणीय शिवप्रेमीच्या सहवासातील हा अविस्मरणीय दिवाळसण असा उल्लेख त्यांनी  केला आहे.

पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी दिवाळीनिमित्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची शुक्रवारी (ता. 14 नोव्हेंबर) पुणे येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्याबाबत त्यांनी 'फेसबुक'वर पोस्ट टाकताच ते मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले.

आजसुद्धा त्यांना नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. भेटीपेक्षाही पुरंदरे यांचे आशीर्वाद घेतल्याने नेटकरी हे खासदार कोल्हे यांच्यावर चांगलेच भडकले आहेत. त्यांनी ही पोस्ट डिलीट करण्याची मागणी केली आहे. 

या भेटीत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना खासदार कोल्हे यांनी आपले शिवगंध हे पुस्तक भेट दिले, तर "छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती' हे पुस्तक त्यांना शिवशाहिरांकडून भेट मिळाले. 

शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रस्तावित शिवसंस्कार सृष्टीबाबतची माहिती या वेळी खासदार कोल्हे यांनी पुरंदरे यांना दिली. या संकल्पनेचे पुरंदरे यांनी भरभरून कौतुक केले. तसेच, स्वराज्य जननी जिजामाता मालिका आणि आगामी चित्रपटाबाबत त्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. यानिमित्त शिवकाळाचा अमूल्य ओघवता खजिना पुन्हा अनुभवता आला, असे खासदार कोल्हे यांनी या भेटीसंदर्भातील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

वयाचे शतक साजरे करणाऱ्या एका आदरणीय शिवप्रेमीच्या सहवासातील हा अविस्मरणीय दिवाळसण असा उल्लेख त्यांनी शेवटी केला आहे. मात्र, पुरंदरे यांची भेट घेत त्यांची आशीर्वाद घेतल्याने डॉ. कोल्हे यांच्यावर शिवप्रेमी प्रचंड संतापले आहेत. 

अमोल कोल्हे हे स्वतःची स्पष्ट वैचारिक भूमिका नसलेले, नाटकी माणूस आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे मोठे होणार, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करताना अस्मितेचे राजकारण कशाला, असे म्हणणार आणि दुसऱ्याच दिवशी बाबासाहेब पुरंदरे यांना भेटणार. नेहमीप्रमाणे यांच्या नाण्याला अनेक बाजू आहेत, अशा शब्दांत व्याख्याते शशांक मोहिते यांनी खासदार कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. 

"बाबासाहेब पुरंदरे यांची व्यक्तिगत पातळीवर भेट घेतली व पुस्तक भेट दिले; म्हणून लगेच खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विचारसरणीवरच संशय व शंका घेणाऱ्यांची कीव येते. केवळ ब्राह्मणद्वेष करणे म्हणजे पुरोगामीत्व नव्हेच. मतभेदांचं रूपांतर मनभेदात करणारे संकुचित वृत्तीचे लोक लोकशाहीला पूरक नसतात,' अशा शब्दांत विकास लवांडे यांनी ट्रोलधाडांना फटकारात खासदार कोल्हे यांची पाठराखण केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख