Why didn't you solve the problem of forest department when you were in power?
Why didn't you solve the problem of forest department when you were in power?

तुम्ही सत्तेत असताना वन विभागाचा प्रश्‍न का सोडविला नाही : भरणे 

इंदापूर तालुक्‍यात विरोधक असलेले राज्य मंत्रिमंडळात 19 वर्ष मंत्री होते. त्यांनी आत्मकेंद्रित राजकारण केल्यामुळे जनतेने त्यांना विधानसभा निवडणुकीत दोन वेळा घरी बसवले आहे. त्यामुळे वन विभागाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेचे राजकारण न करता जनतेने घरी बसण्याचा सल्ला दिला आहे, तो मानावा.

इंदापूर : "इंदापूर तालुक्‍यात विरोधक असलेले राज्य मंत्रिमंडळात 19 वर्ष मंत्री होते. त्यांनी आत्मकेंद्रित राजकारण केल्यामुळे जनतेने त्यांना विधानसभा निवडणुकीत दोन वेळा घरी बसवले आहे. त्यामुळे वन विभागाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेचे राजकारण न करता जनतेने घरी बसण्याचा सल्ला दिला आहे, तो मानावा,'' अशा शब्दांत वन विभागाचे राज्य मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना प्रतित्त्युर दिले. 

इंदापूर तालुक्‍यात वन विभागाने अतिक्रमणांविरोधात कारवाई केली आहे. त्या वेळी झालेल्या नुकसानीची पाहणी हर्षवर्धन पाटील यांनी केली होती. त्या वेळी त्यांनी मंत्री भरणे यांना जबाबदारीची जाणीव करून दिली होती. त्याला राज्य मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी उत्तर दिले आहे. त्यामुळे गेली काही दिवस थांबलेला तालुक्‍यातील राजकीय कलगीतुरा पुन्हा सुरू झाला आहे. 

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटविण्याच्या वेळी झालेल्या नुकसानांची ग्रामस्थांसमवेत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भरणे यांनी नुकसानग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेतले. आगामी काळात एकत्रित बैठक घेवून सर्वानुमते निर्णय घेतला जाईल. जनतेचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. सत्तेत असो किंवा नसो सदैव जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. 

हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका करताना मंत्री भरणे म्हणाले की म्हणाले, तुम्ही सुमारे 19 वर्षे सत्तेत होता. राज्य सरकारमध्ये प्रमुख पदावर होता. असे असताना त्या वेळी तुम्हा हा प्रश्न कायमचा का सोडविला नाही. राजकारण न करता जनता हीच सर्वोच्च मानून जनतेच्या हिताचे निर्णय आगामी काळात घेतले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

या वेळी त्यांनी नागरिकांना मास्कचे वाटप केले. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. शशिकांत तरंगे, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, गोखळीचे सरपंच बापू पोळ, ग्रामपंचायत सदस्य सचिन तरंगे, बाळासाहेब हरणावळ, सचिन वाघमोडे उपस्थित होते. 

मंत्री वळसे पाटील आणि अशोक पवार यांच्यात या निवडीसाठी रस्सीखेच 

शिरूर ः शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी 15 जून रोजी राजीनामा दिला आहे. इतरांना संधी मिळावी म्हणून हा राजीनामा घेण्यात आला आहे. मात्र, उपसभापतींचा राजीनामा सभापतींकडे अद्याप आलेला नाही, त्यामुळे या पदाची निवड लांबण्याची शक्‍यता आहे. 

शिरूर तालुका हा दोन विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. तालुक्‍यातील 39 गावे आंबेगाव मतदारसंघाला जोडण्यात आलेली आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील या दोन्ही विभागाला स्थानिक स्वराज्य संस्थेत संधी देताना नेतेमंडळींना तारेवरची कसरत करावी लागते. सध्याही सभापती-उपसभापती निवडीत शिरूर-आंबेगाव हा समतोल साधण्याचे आव्हान असणार आहे. 

दरम्यान, दीड वर्षांपूर्वी झालेल्या निवडीत बाजार समितीची सभापती-उपसभापती ही दोन्ही पदे शिरूर मतदारसंघातच देण्यात आली होती. त्यामुळे या वेळी दोन्ही पदे किंवा किमान सभापतिपद तरी आंबेगाव मतदारसंघाला मिळावे, अशी आग्रही मागणी या भागातून होत आहे.

बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार व मानसिंग पाचुंदकर यांनी त्यासाठी कंबर कसली आहे. कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेटी घेऊन त्यांना विभागीय अस्मिता जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. या विभागीय अस्मितेला विरोधी भारतीय जनता पक्षाच्या तीन संचालकांचेही पाठबळ मिळण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. त्यामुळे विरोधी संचालकांचा कौल गृहीत धरून खेळी खेळल्या जात आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com