कोरोनावर मिळविला विजय; पण जीवनाची लढाई ते हरले - Victory over Corona; But they lost the battle of life | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

कोरोनावर मिळविला विजय; पण जीवनाची लढाई ते हरले

सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 2 जुलै 2020

श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ते केडगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील खासगी रुग्णालयात गेले. कोरोनासदृश्‍य लक्षणे दिसल्याने तेथील डॉक्‍टरांनी त्यांना सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ते पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात दाखल झाले. त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. उपचारानंतर त्यांची पुन्हा तपासणी केली असता ते निगेटिव्ह आले, त्यामुळे त्यांना बुधवारी (1 जुलै) डिस्जार्च देण्यात आला...

पिंपरी/केडगाव : श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ते केडगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील खासगी रुग्णालयात गेले. कोरोनासदृश्‍य लक्षणे दिसल्याने तेथील डॉक्‍टरांनी त्यांना सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ते पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात दाखल झाले. त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. उपचारानंतर त्यांची पुन्हा तपासणी केली असता ते निगेटिव्ह आले, त्यामुळे त्यांना बुधवारी (1 जुलै) डिस्जार्च देण्यात आला. त्यानंतर ते सायंकाळी बोरीपार्धी (ता. दौंड) येथील घरी गेले. पण, गुरुवारी (ता. 2 जुलै) पहाटे त्यांचा मृतदेह गावालगतच्या लोहमार्गावर आढळला. 

हृदय पिळवून टाकणारी ही काहणी आहे, धनंजय बापूराव सोनवणे (वय 45) यांची. ते मूळचे बोरीपार्धी (जि. पुणे) येथील. मात्र ते पुणे, पिंपरी-चिंचवडमधील खासगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करत होते. 

धनंजय सोनवणे यांना 20 वर्षांची मुलगी आणि 18 वर्षांचा मुलगा आहे. ते एका कंपनीत सेल्समन म्हणून काम करायचे. पत्नी गृहिणी असून त्यांचे एकत्र कुटुंब आहे. त्यांना शिवदास नावाचा मोठा भाऊ आहे. श्‍वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने ते 22 जून रोजी गावी बोरीपार्धीला गेले होते. केडगाव येथील खासगी दवाखान्यात भावाने त्यांना नेले होते. त्या ठिकाणी दोन दिवस उपचार घेतले. 

प्रकृतीत सुधारण होत नसल्याने 24 जून रोजी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. दुसऱ्या दिवशी त्यांचा कोरोनाची रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. उपचारानंतर बरे वाटू लागल्याने त्यांना 30 जून रोजी बालेवाडी येथील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले. परंतु, श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगितल्यामुळे त्यांना पुन्हा वायसीएमला आणण्यात आणले. परंतु, प्रकृती चांगली असल्यामुळे व कोरोना तपासणी रिपोर्ट निगेटीव्ह असल्याने त्यांना बुधवारी (1 जुलै) दुपारी साडेचारच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला. 

त्यांच्या पुतण्याने त्यांना बोरीपार्धी येथे घरी नेले. रात्री नऊच्या सुमारास सर्वांनी जेवण केले. मात्र, गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता धनंजय घरात नसल्याचे लक्षात आले. सकाळी सहाच्या सुमारास माहिती मिळाली की, लोहमार्गावर कुणाचा तरी मृतदेह सापडला आहे. त्या ठिकाणी जाऊन पाहिले तर, तो धनंजय यांचा मृतदेह होता, असे त्यांचे भाऊ शिवदास यांनी यवत पोलिसांत दिलेल्या खबरीमध्ये दिली आहे. 

दरम्यान, केडगावच्या आमच्या बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने ते काही दिवस पिंपरी येथे मुक्कामी होते. आजारी पडल्याने ते घरी आले होते. केडगावातील खासगी डॉक्‍टरांकडे त्यांनी तेरा दिवसांपूर्वी तपासणी केली. डॉक्‍टरांना कोरोनाची लक्षणे दिसल्याने त्यांनी त्यास सरकारी दवाखान्यात उपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ते दाखल झाले, त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पण, उपचारानंतर त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते. 

दरम्यान, धनंजय यांनी आजाराला कंटाळून रेल्वेखाली आत्महत्या केल्याची फिर्याद त्यांचा भाऊ शिवदास यांनी यवत पोलिस ठाण्यात दिली आहे. 

वर्तणुकीत बदल 

बोरीपार्धीचे सरपंच व वायसीएममधील महिला अधिकारी यांच्यातील संभाषणाची क्‍लिप "सकाळ'च्या हाती मिळाली आहे. त्यात महिला अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, धनंजय हे कोरोना पॉझिटिव्ह होते. परंतु, उपचारानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आम्ही बुधवारी (1 जुलै) नियमानुसार त्यांनी घरी सोडले. परंतु, रुग्णालयात असताना त्यांच्या वर्तणुकीत फरक जाणवत होता. रोज मध्यरात्री तीन वाजता उठून "छातीत घास अडकला आहे,' असे ते सांगायचे. इतक्‍या रात्री जेवण देत नसल्यामुळे आम्ही त्यांना पाणी प्या, असे सांगत असू. पाणी पिल्यावरही ते विचित्र वागायचे. त्यामुळे चोवीस तास त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख