उरुळी कांचनच्या रिक्षाचालकाची अशीही समाजसेवा 

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील रिक्षा चालकाने लॉकडाउनच्या काळात उरुळी कांचन व परिसरातील दिव्यांग व ज्येष्ठ व्यक्तींना दवाखाना, बॅंकेत जाणे,किराणामाल भरणे, सिलिंडर आणणे अशा विविध कामासाठी विनामोबदला घरपोच रिक्षासेवा पुरवून मदतीचा नवा अध्याय रचला आहे.
Two months free travel from rickshaw driver to handicapped, senior citizens
Two months free travel from rickshaw driver to handicapped, senior citizens

उरुळी कांचन ः लॉकडाउनच्या काळात गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना मदत व्हावी, या उद्देशाने शहरापासून ते थेट खेडेगावातील गल्लीबोळापर्यंत कोणी किराणा मालाचे किट वाटले, कोणी कपडे वाटली, तर कोणी सॅनिटायझर... मात्र, उरुळी कांचन (ता. हवेली) येथील रिक्षा चालकाने लॉकडाउनच्या काळात उरुळी कांचन व परिसरातील दिव्यांग व ज्येष्ठ व्यक्तींना दवाखाना, बॅंकेत जाणे, किराणा माल भरणे, सिलिंडर आणणे अशा विविध कामासाठी विनामोबदला घरपोच रिक्षासेवा पुरवून मदतीचा नवा अध्याय रचला आहे. 

पप्पू ऊर्फ विपुल मोहन घोडके (वय 36) असे या रिक्षा चालकाचे नाव आहे. तो उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत तुपे वस्ती येथे राहतो. विपुल घोडके या रिक्षा चालकाने मागील अडीच महिन्याच्या लॉकडाउनच्या काळात उरुळी कांचन व परिसरातील दीडशेहून आधिक दिव्यांग व ज्येष्ठ व्यक्तींना बॅंकेत, दवाखान्यात ने आण करणे, किराणा माल घरपोच करणे, गॅस एजन्सीमधून सिलिंडर आणून देणे, अशी विविध कामे त्याने विनामोबदला केली आहेत. मात्र, हे करताना सोशल मीडियात एकही फोटो अथवा कमेट त्याने येऊ दिलेली नाही, हे विशेष. 

कोरोनामुळे सरकारने मागील दोन महिन्यांपासून लावलेल्या लॉकडाउनमुळे मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणेच विपुल व त्याच्या कुटुंबांलाही जगण्याची भ्रांत निर्माण झाली होती. मात्र, विपुलने आपल्या कुटुंबाची जगण्याची भ्रांत बाजूला ठेवून जनसेवेचा वसा जो मनात घर करून होता, तो जपण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्याने गेल्या दोन महिन्यापासून रिक्षाच्या माध्यमातून समाज सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. 

विपुल याने मागील अडीच महिन्याच्या काळात उरुळी कांचन व परिसरातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या राहत्या घरातून दवाखान्यात अथवा मेडिकल दुकानात ने-आण करणे, बॅंकेत घेऊन जाणे, किराणा सामान खरेदी करण्यासाठी वा गॅस सिलिंडर आणण्यासाठी घरपोच सेवा देणे अशी कामे केली आहेत.

विपुलने आपला मोबाईल नंबरही ग्रामपंचायत कार्यालय, पोलिस चौकी आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या अक्षरात लिहून ठेवला आहे. ज्या व्यक्तीला प्रवासासाठी रिक्षाची गरज भासते, ती संबंधित व्यक्ती या मोबाईल फोनवर मदतीसाठी फोन करतात. फोन येताच विपुल तत्काळ फोन करणाऱ्याच्या घरी जाऊन मदतीचा हात पुढे करतो. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com